esakal | Sangli : सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांच्या जाळ्यात

सांगली : सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा रेकॉर्डवरील आरोपीला विटा पोलिसांनी पकडले. सीताराम लक्ष्मण येडगे (वय २८, रा. पानीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील दहा लाख बारा हजार रुपये किमतीचे चोरीचे साहित्य जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. करंजे (ता. खानापूर) येथील शिवेच्या मळ्यातून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर ४ ऑगस्ट रोजी चोरी झाल्याची फिर्याद मारुती विठोबा माने (रा. करंजे) यांनी विटा पोलिसांत दिली होती. त्याचा तपास करत असताना खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी येडगे याला विटा येथे ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सांगली व सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ लाख ३४ हजारांचा एक ट्रॅक्टर, ४ लाख ५८ हजारांचे सहा रोटर, ५५ हजारांचे एक औषध फवारणी करण्याचे यंत्र, ९९ हजारांचे स्टाईल फरशीचे ९९ बॉक्स, ५० हजार रुपये किमतीचे एक टन लोखंडी अगल, ४ हजार ५०० रुपयांची आठ सिमेंट पत्र्याची पाने व १२ हजारांचे आठ रंगाचे डबे असा एकूण १० लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा: "हाथरस घटनेवर अश्रू ढाळणाऱ्या प्रियांका पुण्यातील प्रकरणावर चुप?"

त्याच्यावर कवठेमहांकाळ, आटपाडी, सांगोला, विटा पोलिसांत चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे श्री. डोके यांनी सांगितले.

ही कारवाई कारवाई पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष डोके, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पांडुरंग कन्हेरे, रवींद्र धादवड, हणमंत लोहार, शशिकांत माळी, सुरेश भोसले, प्रदीप पाटील, शिवाजी हुबाले, संतोष घाडगे, महेश खिलारी, सुहास खुबीकर, सुधाकर पाटील, लक्ष्मण गुरव, महावीर कांबळे, तुकाराम नागराळे, राजेंद्र भिंगारदेवे, अमर सूर्यवंशी, रोहित पाटील, श्री. गुंडवाडे यांनी केली.

loading image
go to top