निसर्गरम्य आजोळी यापूर्वीच का आणले नाही!

निसर्गरम्य आजोळी यापूर्वीच का आणले नाही!

माजगाव - सुंदर निसर्गरम्य गोलिवडे येथे मामांनी आम्हाला आजोळी का आणले नाही, अशी खंत सरोजताई पाटील यांनी व्यक्त केली. त्या गोलिवडे (ता. पन्हाळा) येथील शारदाबाई पवार प्राथमिक शाळेच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

सरोजताई पाटील म्हणाल्या, ‘‘आमच्या वडिलांनी आईला पूर्ण स्वातंत्र्य दिले. यामुळे ती १९३२ मध्ये पहिली महिला नगराध्यक्ष बनली. तेव्हापासून त्या राजकारणासह समाजकारणात सहभागी झाल्या. त्यामुळे आम्ही संस्कारशील बनलो.’’  त्या म्हणाल्या, ‘‘शाळा इमारत देखणी नको, तर येथे शिक्षण देणारे शिक्षक तळमळीचे पाहिजेत. तरच देशाला पुढे घेऊन जाणारे विद्यार्थी घडतील.’’

ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी आजोळच्या शाळेसाठी सव्वा कोटीचा निधी देऊन भक्कम शैक्षणिक काम केले. यामुळे येथील मुलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मिटला, असे कोल्हापूरच्या महापौर सौ. मोरे यांनी सांगितले.

‘महिला दिनानिमित्ताने येथील महिलांना मोकळीक द्यावी, त्यांचा आदर करावा. या देशाच्या जडणघडणीत महिला पुढे असतील. मुलांना अभ्यासाबरोबर खेळायला वाव दिला तरच तो योग्य नागरिक घडेल,’ असे विजया पाटील यांनी मनोगतात सांगितले. राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी गोलिवडे गावाबद्दल मनोगत व्यक्त केले.

सरपंच नंदा चेचर, सुनीता पाटील यांच्या हस्ते प्रमुख व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. बाबासाहेब पाटील 
आसुर्लेकर, अनिल पाटील, किसन कल्याणकर, पोलिसपाटील पद्‌मजा पाटील, आदिल फरास, जाहिदा मुजावर, जयकुमार शिंदे, संतोष धुमाळ उपस्थित होते. 

प्रास्ताविक बाबासाहेब शिपुगडे यांनी केले. जनार्दन अतिग्रे यांनी आभार मानले.

गोलिवडे वेगळ्या वाटेवरचे गाव..
पंचवीस वर्षांपासून गोलिवडे गावात कोणत्याही प्रकारची निवडणूक झाली नाही. गावात यात्रा होते, ती शाकाहारी असून, गावात एकच अडीचशे तरुणांचे मंडळ असून ते झांजपथकाचे काम करतात. मिळणारे उत्पन्न सामाजिक कार्याला वापरण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com