esakal | Video : एक टाळी विशेष मुलांसाठी वाजलीच पाहिजे
sakal

बोलून बातमी शोधा

Video : एक टाळी विशेष मुलांसाठी वाजलीच पाहिजे

पालकांनी अभ्यासाची मागणी सुरू केली. त्यानुसार संस्थाचालकांनीही सकारात्मक दर्शवली. त्यात व्हॉटसअपवर चार ग्रुप तयार केले. त्यावर मुलांना बौध्दीक कौशल्ये, स्वावलंबन कौशल्ये, चित्रकला, संगीत, स्वयंरंजन असे हातळण्याचे काम शिक्षकांनी सुरू केले. 35 ते 36 व्हीडीओ गोळा झाले. पालक विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत आहेत अशी माहिती मेधा देवधर यांनी दिली.

Video : एक टाळी विशेष मुलांसाठी वाजलीच पाहिजे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन होण्यापूर्वीच शाळा, महाविद्यालयेही बंद झाली. तेव्हापासून बंद झालेली शाळा, महाविद्यालये पुन्हा केव्हा सुरू होणार हे निश्‍चितपणे सांगता येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ई लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून ठेवले आहे. मात्र यामध्ये विशेष मुलांना ई-लर्निंग द्यायचे तसे असणाऱ्या अडचणी लक्षात घेत येथील संजीवनी इन्स्टीट्यूटच्या मतिमंद मुलांच्या शाळेने पुढाकार घेत ई-लर्निंगसाठी पुढाकार घेतला आहे. व्हॉटसअॅप व ईमेलच्या माध्यमातून दररोज पालकांपर्यंत अभ्यासक्रम देवून तो शिकवण्याची जबाबादारी पालकांवर सोपवत या विशेष मुलांनाही अभ्यासात मग्न ठेवण्यात यश मिळवले आहे. 

देशात व राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे लोकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. या सर्वांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवित्य अधांतरी असल्याचे दिसून येते. कोरोनांचा संसर्ग वाढू नये यासाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच मंदीरे, शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच अंतिम वर्षाच्या परिक्षाही रद्द करण्याबाबात विद्यापीठ अनुदान आयोगाकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षाही रद्द होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र शाळा, महाविद्यालय बंद झाल्या तरी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना अभ्यासात मग्न ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासात जात आहे. मात्र या सर्व घडामोडीत विशेष मुलांचा वेळ कसा जात असेल, त्यांच्या अभ्यासाचे काय ? याबद्दलचे अनेक प्रश्‍न उपस्थित होत होते. मात्र येथे तीन दशकाहून अधिक काळ मतिमंद मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या संजीवनी इन्स्टिट्यूट संस्थेने कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटात सर्वसाधारण मुलांप्रमाणे या विशेष मुलांना कशाप्रकारे गुंतवून ठेवता येईल. याचा अभ्यास केला. 

यामध्ये सर्वसाधारण व मतिमंद व्यक्ती यांच्यात बराचसा फरक असला तरी मानसिक गुंतवणूक, कार्यक्षमता, वेळेचे नियोजन, मनोरंजन आदी गोष्टी समान आहेत. त्यामुळे शाळा सुरू कधी होणार याबाबत अद्याप संभ्रम असला तरी त्या सुरु झाल्यावर कशा पद्धतीने चालवायच्या हे ही संस्थाचालकांनाही माहिती नाही. त्यासाठी सुट्टीच्या काळात संजीवनी संस्थेच्या चालकांनी ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देता येईल का ? हा विचार केला. त्यानुसार प्राथमिक स्वरुपात प्रयोग करण्याचे ठरले. त्यातून व्हॉटसअॅप, ई मेलच्या माध्यमातून पालकांना रोजच्या रोज अभ्यासक्रम देवून पालकांनी तो आपल्या पाल्याकडून करवून घेण्याचे तंत्र अवलंबले. संस्थेचे सचिव विश्‍वेश राव यांचे यासाठी विशेष सहकार्य मिळाले. या उपक्रमास पालकांसह पाल्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाळेतील दोन विशेष शिक्षक आणि दोन कला शिक्षकांच्या सहाय्याने हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमामुळे विशेष मुले घरबसल्या कामात मग्न झाल्याचे आज चित्र पहावयास मिळत आहे. 

एक आठवण! सचिनचे दातृत्व अन् विशेष मुलांसाठी साकारले प्रशिक्षण केंद्र!

हेही वाचा - आप्पासाहेब पाटील सृजनशील व्यक्तिमत्त्व

अवश्य वाचा - ऐकशील थोडं माझं..??

पालकांनी अभ्यासाची मागणी सुरू केली. त्यानुसार संस्थाचालकांनीही सकारात्मक दर्शवली. त्यात व्हॉटसअपवर चार ग्रुप तयार केले. त्यावर मुलांना बौध्दीक कौशल्ये, स्वावलंबन कौशल्ये, चित्रकला, संगीत, स्वयंरंजन असे हातळण्याचे काम शिक्षकांनी सुरू केले. 35 ते 36 व्हीडीओ गोळा झाले. पालक विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत आहेत.
मेधा देवधर, विशेष शिक्षीका, संजीवनी इन्स्टीट्यूट. कऱ्हाड. 

loading image