घरी परतण्याची ओढ ठरली घातकी; अंबेनळी घाटातील अपघातात एक ठार

घरी परतण्याची ओढ ठरली घातकी; अंबेनळी घाटातील अपघातात एक ठार

मेढा (जि.सातारा) : आपल्या कामा धंद्या निमित्त मेढयातील गांधीनगर मधील दोन कटुंब रायगड जिल्हयातील पेन येथे गेली होती. मात्र लॉकडाऊनवर लॉकडाऊन वाढत गेल्याने त्यांचा धीर सुटला अखेर ती आपल्या मेढा गावी घराच्या ओढीने निघाली खरी मात्र त्यातल्या एकाला वाटेतच झालेल्या अपघातात मृत्युने कवटाळले. तर दूसरा गंभीर जखमी झाला आहे.

ती दोन कटुंब गावच्या अन् घराच्या ओढीन आपल्या माणसात यायला निघाली, मात्र नियतीने घाला घातला. अंबेनळी घाटात टेम्पोने समोरासमोर धडक दिल्याने या दोन कंटुबाच्या दोन्ही कटुंबप्रमुखांना उडवले. या अपघातात महादेव चंदर मोरे ( वय ४४ ) जागीच ठार झाले. तर वसंत रामचंद्र पवार ( वय 3८) सुदैवाने बचावले मात्र गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले की महादेव मोरे हे मेढयातील गांधीनगर व वसंत पवार ( मूळ गांव सरताळे ता. जावळी) मात्र दोघांची मेढा येथे घरे असून येथेच कायमचे रहिवाशी आहेत. दोघेही आपल्या पत्नींसह मुलांबाळासोबत पेण (जि. रायगड) येथे बांगडयांचा व कांदा बटाटा व्यवसायासाठी गेले होते. मात्र त्यांची घरे गांधीनगर मेढा येथे आहेत. त्यांना आपल्या घरी यायचे होते मात्र लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले. लॉकडाऊन वाढल्याने अखेर ती आपल्या मेढा गावी पेण येथून पोलादपूर मार्ग निघाले. व्यवसाय असल्याने त्यांच्या मोठया जीपगाडीत बाजार व व्यवसायाचे साहीत्य त्यासोबतच दोघांच्या पत्नी व मुले होते. वसंत पवार आणि महादेव मोरे मोटारसायकलवरून येत होते. 

गावंच्या ओढीने येत असतानाच जिल्हयाच्या हद्दीत प्रवेश करण्यापुर्वीच एका भरधाव टेम्पोने धडक दिली. यामध्ये मोटारसायकल चालक महादेव मोरे जागीच ठार झाले, तर वसंत पवार गंभीर जखमी झाले.  यामध्ये मयत महादेव मोरे यांना महाबळेश्वर येथे आणण्यात आले तेथेच शवविच्छेदन करण्यात आले तर वसंत पवार यांच्यावर पोलादपूर येथे उपचार सुरु आहेत.

मृतदेह घरातच ठेवणारे अर्णवचे आई-बाबा असे का वागले?

दरम्यान शिवसेना नेते एस.एस पार्ट गुरुजी व संजय सपकाळ यांनी पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांना अपघात घडल्या घडल्या फोन वरून संपर्क साधला त्यामुळे आमदार गोगावले तातडीने घटनास्थळी जावून सर्व मदत व सहकार्य केले. त्यामुळे पोलिस आणि आमदार गोगावले यांच्यामुळे एकजण बचावला असल्याचे समाजसेवक संजय सपकाळ यांनी सांगितले. 

फलटण शहर : दारुच्या पैशांवरुन वादावादी; एकाचा मृत्यू

प्रेमीयुगुलांसह हौशे नवशे गवश्यांनी घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सकाळी धाकधूक, सायंकाळी दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com