पुण्यातील सहायक पोलिस आयुक्तावर भुईंजला खंडणीचा गुन्हा दाखल

पुण्यातील सहायक पोलिस आयुक्तावर भुईंजला खंडणीचा गुन्हा दाखल
Updated on

भुईंज (जि.सातारा) ः वाईतील गोळीबाराच्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी आणलेल्या दोघांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एका बड्या पोलिस अधिकाऱ्याने 40 हजार रुपयांची खंडणी मागितली. वाई येथे पोलिस उपअधीक्षकपदी सेवा बजावलेले व सध्या पुणे शहर पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या दीपक हुंबरे याच्यावर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वाई येथे आपसातील वरर्चस्वावरून दोन टोळ्यांत टोळीयुद्ध झाले होते. त्यात गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, तो फरारी आहे. त्याबाबत भुईंज येथील काही युवकांची भुईंज पोलिस ठाण्यात चौकशी सुरू होती. त्या दरम्यान सक्तीच्या रजेवर असतानाही दीपक हुंबरे हे पोलिस गणवेशात भुईंज पोलिस ठाण्यात येऊन गेले व परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर संबंधित तरुणांना फोन करून भुईंज बस स्थानकात बोलावले. "भुईंज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्‍याम बुवा यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. तुम्हाला यात काही त्रास होणार नाही. माझे काय करता बोला, अन्यथा या गुन्ह्यात अडकावावे लागेल,' अशी भीती दाखवली. फिर्यादी व त्याच्या मित्राने "तुमचे किती द्यायचे सांगा,' असे विचारले असता हुंबरेने 50 हजार रुपये सांगितले. त्यावर फिर्यादीने "इतके पैसे नाहीत' म्हटल्यानंतर त्याने प्रत्येकी 20 हजार देण्यास सांगितले. महामार्गावर "जोशीविहीर येथे उड्डाण पुलाखाली पैसे घेऊन या' असे त्यांना सांगितले. तेथून फिर्यादी व त्याच्या मित्राने घरी जाऊन प्रत्येकी 20 हजारांप्रमाणे 40 हजार रुपये जोशीविहीर येथे जाऊन हुंबरेला दिली.

या घटनेची तपास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, वाईचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा करीत आहेत. 

एकाच दिवशी कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या आणि मृत्यूही 

भयावह : सातारा जिल्ह्यात मृत्यूचे सत्र सुरुच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

India sugar price hike due to production decline
BSNL network problem in Sangli villages
Solapur crime
Warana Dam gates opened
Marathi News Esakal
www.esakal.com