लाॅकडाऊनच्या काळात वाधवांन बंधूंचा प्रवास काही संपता संपेना; आता सीबीआयच्या ताब्यात

लाॅकडाऊनच्या काळात वाधवांन बंधूंचा प्रवास काही संपता संपेना; आता सीबीआयच्या ताब्यात

सातारा : येस बँक घोळाप्रकरणातील प्रमुख आरोपी व उद्योगपती वाधवान बंधुंना ताब्यात घेण्यासाठी आज (रविवार) दुपारी सीबीआयचे पथक महाबळेश्वरात दाखल झाले. हे पथक काही तासांतच वाधवान बंधूंना ताब्यात घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. दरम्यान याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती जनेतस पाेचविताना कायदा सर्वांना समान आहे असे म्हटले आहे.

सातारा जिल्हा प्रशासनाने दोन तीन दिवसांपूर्वीच वाधवान कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारून महाबळेश्वरातील निवासस्थानांत १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइनचे केले होते. सीबीआयने काही दिवसांपुर्वीच सातारा पाेलिसांशी संपर्क साधून वाधवान बंधूंना आमच्या ताब्यात द्यावी अशी मागणी पत्राद्वारे केली हाेती. त्यावेळी पाेलिस अधीकक्षक तेजस्वी सातपुते यांनी दळवळण यंत्रणा तयार ठेवावी तसेच लागेल ती यंत्रणा देऊन सहकार्य केले जाईल असे नमूद केले हाेते.

संचारबंदी, जिल्हाबंदीच्या काळात कपील आणि धीर वाधवान हे दाेन्ही बंधु गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्रान्वय लोणावळा ते महाबळेश्वर हा प्रवास सुकर झाला असला तरी वाधवान बंधूंना प्रवासासाठी पत्र देणे हे गुप्ता यांच्या चांगलेच अंगलट आले. गुप्ता यांना राज्य शासनाने तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु

 Video गावात आले यमराज...अन्‌ म्हणताय मृत्यूदंडाची शिक्षा द्या!
  
येस बॅंक आर्थिक घोटाळयातील आरोपी वाधवान बंधु हे जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वर येथे आल्याचे जिल्हा प्रशासनाला समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना त्यांची चौकशी करण्याची सूचना केली होती. वाधवान यांच्यासह एकुण २३ जणांची वैदयकिय तपासणी करण्यात आली. सुदैवाने तपासणीत कोणीही कोरोना पॉझिटीव्ह आढळुन आला नाही. तरीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाधवान यांच्यासोबत आलेल्या २३ जणांना नऊ एप्रिलपासुन पांचगणी येथे संस्थात्मक क्वारंटाईन केले. 

त्याची मुदत २२ एप्रिलला संपल्यानंतर दुसऱ्या (गुरूवारी) दिवशी दुपारी जिल्हा प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी केली तसेच त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले. त्यानंतर बेलएअर हॉस्पिटलच्या दोन बसमधून चोख पोलिस बंदोबस्तात महाबळेश्वरातील दिवाण व्हिला या वाधवान यांच्या निवासस्थानी मुक्कामी रवाना केले. या बंगल्यात ते पुढील १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणार होते. 

Breaking : अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे : शिवेंद्रसिंहराजे

महाबळेश्वर : ...अखेर वाधवानांची इच्छा पुर्णत्वास

आज (रविवार) दुपारी सीबीआयचे पथक दोन गाड्या घेऊन महाबळेश्वरात दाखल झाले. त्यांनी दिवाण व्हिला येथे जाऊन वाधवान बंधूंना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर काही वेळातच वाधवान बंधूंना घेऊन सीबीआयचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com