esakal | एकतर्फी प्रेम अन् गहिवरले आई वडील
sakal

बोलून बातमी शोधा

एकतर्फी प्रेम अन् गहिवरले आई वडील

सहा मे रोजी संबंधित युवकाला समाजसेवा अधीक्षक थिटे, पुरुष परिचर काळे, चालक राकेश यादव हे त्याच्या सांगली येथील घरी सोडून आले. त्याला सुखरूपपणे आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी त्या दोघांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे हृदय शतश: आशीर्वाद देत होते. 

एकतर्फी प्रेम अन् गहिवरले आई वडील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : चांगले शिक्षण घेऊन मुलगा चांगल्या आयटी कंपनीत नोकरीला लागला. आई- वडिलांना जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटू लागले. मात्र, एकतर्फी प्रेमाने घात केला. बुद्धिमान मुलगा मानसिक रुग्ण झाल्याने कुटुंबाची परवड सुरू झाली. रागाच्या भरात घराबाहेर पडलेला सांगलीचा हा युवक वणवण भटकत कोरेगावला आला. कोरोनाचा संशयित म्हणून दाखल झालेल्या युवकाला जिल्हा रुग्णालयातील मानसिक उपचार विभागामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे महिन्याने ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट झाली. 

कोरेगाव तालुक्‍यातील किन्हई प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 33 वर्षांच्या एका तरुणाला कोरोनाचा संशयित म्हणून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्या युवकासोबत कोणीही नातेवाईक नव्हते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राने त्या रुग्णाची एमएलसी (मेडिको लीगल केस) सातारारोड पोलिस दूरक्षेत्रात नोंद केली. जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, त्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढविली. रुग्णालयात दाखल असतानाच त्याने ब्लेडने हातावर वार करून घेतले. रुग्णालयातील कर्मचारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. परंतु, जखम कशी झाली, याबाबत विचारपूस करताना तो असंबंध बडबडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे हे प्रकरण जरा वेगळेच दिसतेय, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याच्या शेजारच्या रुग्णांकडे चौकशी केली. त्या वेळी त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे त्यांना समजले. वॉर्डमधील कर्मचाऱ्यांनी अशी माहिती दिल्यानंतर मानसिक विभागातील कर्मचाऱ्यांनी या युवकाबरोबर संवाद साधला. परंतु, तो स्वत:विषयी कोणतीच माहिती सांगत नव्हता. निरीक्षणावरून त्याला मानसिक उपचार देणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे मत झाले. परंतु, जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मस्कर या मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याशी चर्चा झाल्यानंतर संबंधित रुग्णाला व्हिडिओ कॉलिंगच्या साह्याने त्यांना दाखविण्यात आले. परंतु, मानसोपचार तज्ज्ञाला प्रत्यक्ष रुग्ण दाखविणे आवश्‍यक होते.

त्यामुळे वरिष्ठांच्या सल्ल्यानंतर खासगी डॉ. अभिजित घोरपडे यांना दाखवून रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले. उपचारानंतर त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू करण्यात आला. त्याच्या जवळचे साहित्य चाळल्यावर डायरीमध्ये घरचा एक क्रमांक मिळाला. त्यावर त्याच्या आईशी संपर्क झाला. त्या वेळी तो एमसीए झाला असल्याचे तसेच पुण्यातील इन्फोसिस कंपनीत कामाला असल्याचे आईने सांगितले. त्याचबरोबर एकतर्फी प्रेमातून त्याला मानसिक आजार झाल्याची माहितीही आईने कर्मचाऱ्यांना दिली. मुलगा सुरक्षित असल्याचे समजल्यावर आईचाही जीव भांड्यात पडला. माझ्या मुलाला नीट सांभाळा हो, असे त्या वारंवर कर्मचाऱ्यांना सांगत होत्या. माझ्याकडे त्याला सोडा असेही विणवत होत्या. परंतु, अडचण होती ती कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनची. 

चार-पाच दिवसांत उपचार व समुपदेशानामुळे युवक शांत झाला होता. स्वत:विषयी माहिती सांगू लागला होता. या दरम्यान त्याचा कोरोनाचा अहवालही निगेटिव्ह आला. त्यामुळे रुग्णालयातील मानसिक विभागातील समुपदेशक संदीप मंगरूळे, क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट सीमा वाघमारे, सायकॅट्रिक ब्रदर भाटे यांच्या प्रयत्नांनी युवकाच्या मानसिक स्थितीत चांगला फरक पडला होता. त्यामुळे रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक गीता कारंजकर व सचिन थिटे यांनी दुरावलेला मुलगा व आई-वडिलांची भेट घडवून देण्यासाठी कंबर कसली. लॉकडाउन असल्यामुळे त्यांनी दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांकडे पाठपुरावा केला. त्यांना जिल्हा कायालयातील हेल्पलाइन समन्वयक प्राची मोरे यांचीही मदत झाली. त्यातून त्यांना युवकाला घरी सोडण्याची परवानगी मिळाली. 

Coronavirus : जिवाचा धोका पत्करुनही परिचारीका तीन महिने पगारविना

तोंडातून शब्दच फुटत नव्हते... 

दरम्यान, सहा मे रोजी संबंधित युवकाला समाजसेवा अधीक्षक थिटे, पुरुष परिचर काळे, चालक राकेश यादव हे त्याच्या सांगली येथील घरी सोडून आले. त्याला सुखरूपपणे आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी त्या दोघांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे हृदय शतश: आशीर्वाद देत होते. 

त्यांनी पळून गेलेल्या आमदारांना आणलं होतं पकडून... आज झालं चीज 

सातारा : केशरी रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी 

अभिमानास्पद : देशातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांत कृष्णाची निवड; कोरोनावरील लस सामन्यांना उपलब्ध हाेणार

loading image
go to top