सातारा हादरला : आणखी सहा रूग्ण वाढले, दिवसभरात 46 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णां संख्या 247 झाली आहे. यापैकी उपचार घेत असलेले रुग्ण 127 असून कोरोनामुक्त होवून घरी गेलेले रुग्ण 114 आहेत. तर सहा जणांचा मृत्यु झालेला आहे.

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात शनिवारी सकाळी 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या धक्क्यातून सावरत असताना सायंकाळी आणखी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात पाटण तालुक्यातील चार तर कऱ्हाड तालुक्यातील म्हासोलीतील दोन बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे एका दिवसात जिल्ह्यात 46 कोरोनाचे रूग्‍ण सापडल्याने कोरोनाचे सावट गडद झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात आजअखेर बाधितांची संख्या 247 झाली आहे. 

जिल्ह्यात शुक्रवारी एकही बाधित न सापडल्याने दिलास मिळाला असतानाच आज सकाळी सुमारे 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा हादरून गेला. यात कऱ्हाड, पाटण, फलटण, माण, सातारा, खंडाळा, वाई तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. एकाचवेळी 40 बाधित रूग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात सायंकाळी पुन्हा नव्याने सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

बाधितांमध्ये पाटण तालुक्यातील ढेबेवाडीतील 18 वर्षीय युवती तसेच 23 वर्षाचा युवक व  44 वर्षाची महिला, गलमेवाडी येथील 24 वर्षीय महिला तसचे कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली येथील 15 वर्षाची मुलगी व 71 वर्षाचा पुरूषाचा समावेश आहे. एकाच दिवसात बाधितांची संख्या 46 झाल्याने  प्रशासनासह आरोग्य विभागही चक्रावून गेला आहे. 

 आज दिवसभरात साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 20, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 44, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 54,  उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील दोन व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील आठ असे एकूण 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णां संख्या 247 झाली आहे. यापैकी उपचार घेत असलेले रुग्ण 127 असून कोरोनामुक्त होवून घरी गेलेले रुग्ण 114 आहेत. तर सहा जणांचा मृत्यु झालेला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara : Corona Infected Patients Increased Today