सातारा जिल्ह्यासाठी आजचा शुक्रवार ठरला ब्लॅक फ्रायडे : 11 रुग्ण वाढले

सातारा जिल्ह्यासाठी आजचा शुक्रवार ठरला ब्लॅक फ्रायडे : 11 रुग्ण वाढले

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची  येथील आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आज (शुक्रवारी) आलेल्या आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यात एकाच दिवशी तब्बल दहा कोरोना बाधित सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 42 झाली आहे.बधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा शहरात देखील एक काेराेनाबाधित आढळला आहे. 

सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात एकट्या कऱ्हाड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढु लागले आहे. तालुक्यात पहिला रुग्ण तांबवे येथे सापडला. त्यानंतर म्हारुगडेवाडी येथे मुंबईवरुन आलेला रुग्ण सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्य झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अन्य एकाला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर हजारमाचीत रेल्वेचा कर्मचारी बाधीत म्हणुन सापडला. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच चरेगाव आणि बाबरमाची येथे दोन रुग्ण सापडले. त्यानंतर तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर दोन्ही ठिकाणची कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संबंधित ठिकाणी कोरोनाची साखळीच सुरू झाल्याचे दिसत आहे. तेथील रुग्ण सर्वाधिक असल्यामुळे दोन्ही ठिकाण कोरोनासाठी हॉटस्पॉटच झाली आहेत.

कराड तालुक्यात शनिवारी (ता .25) एकाच दिवशी तब्बल 12 कोरोना बाधित सापडले. त्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे.  अशातच आज (शुक्रवारी) सकाळच्या टप्प्यात आठ तर सायंकाळच्या टप्प्यात दोन अशा दिवसभरात दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. वाढलेल्या दोन रुग्णांमध्ये वानवासमाचीतील महिला व मुलीचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता आणखीच वाढली आहे.                                                              

जिल्हाधिकाऱ्यांची कराडला तातडीची बैठक

सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या 55 इतकी झाली आहे. त्यातच कराडला एकाच दिवशी दहा रुग्ण वाढल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश शिंदे तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांच्यासह आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणेची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी आरोग्य विभागाने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन यापुढे करायचा उपाययोजनेसंदर्भात काही सूचनाही केल्या आहेत.

बेजाबदारपणामुळे कऱ्हाडची कोरोनाची साखळी सातारला पाेहचली ?


276 नागरिकांना केले विलगीकरण कक्षात दाखल

दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 43 (आरोग्य कर्मचारी- 24, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे- 2,  कोविड बाधित रुग्णांचा निकट सहवासित- 8, प्रवास करुन आलेले- 8, व कोरोना बाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा पहिला नमुना-1), कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 95 (कोरोना बाधिताचे निकट सहवासित-90, कोरोना बाधित परिसरातील गरोदर माता-5), वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 122 (आरोग्य कर्मचारी-10 कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-57, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 21, कोरोना परिसरातील गरोदर माता-10, कोरोना बाधित निकट सहवासितांचा 14 दिवसांनतरचा नमुना-23), ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 16 (आरोग्य कर्मचारी-4, प्रवास करुन आलेले-3, कोरोना बाधिताचे निकट सहवासित-9) अशा एकूण 276 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

1.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
 1.    क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा    1422
2.    कृष्णा हॉस्पीटल, कराड-    544
3.    एकूण दाखल -    1966
    प्रवासी-259, निकट सहवासीत-1098, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-265,आरोग्य सेवक-301, ANC/CZ-48 एकूण= 1966
4.    अनिर्णित नमुने-    7
5.    14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-    21
6     एकूण घेतलेले नमुने    28
7.    कोरोना बाधित अहवाल -    55
8.    कोरोना अबाधित अहवाल -    1395
9.    अहवाल प्रलंबित -    516
10.    डिस्चार्ज दिलेले-    1403
11.    मृत्यू    2
12.    सद्यस्थितीत दाखल-    561
13.    आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 30.4.2020) -    1928
14.    होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -    1928
15.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -    780
16.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –    1148
17.    संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-    237
18.    आज दाखल    0
19    यापैकी डिस्जार्ज केलेले-    172
20.    यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0
21.    अद्याप दाखल -    65

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com