साेनके, तरडगावला काेराेनाबाधित आढळले; साताराची चिंता वाढली

साेनके, तरडगावला काेराेनाबाधित आढळले; साताराची चिंता वाढली
Updated on: 

सातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासित एक, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पुणे कारागृहातून सातारा येथे प्रवास करुन आलेले दाेन, उपजिल्हा रुग्णालय फलटण (तरडगावातील) येथे बाधित रुगणाच्या निकट सहवासित एक व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे कराड येथून प्रवास करुन आलेला साेनके (ता. काेरेगाव) येथील एक असे एकूण पाच जणांचे अहवाल कोविड-19 बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान शुक्रवारी रात्री कराड तालुक्यात 14 जणांना काेविड 19 याची लागण झाल्याचे अहवाल आले हाेते.  आता सातारा जिल्ह्यात 64 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 74 बाधित रुग्ण आढळले आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 20, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 10, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 12, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 व वाई येथील 1 असे एकूण 64 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

सातारा : औषध हवयं ? घरा बाहेर पडू नका...घरपोच मिळणार

सातारा जिल्हा हा रेड झाेनमध्ये गेला आहे. त्यातच शुक्रवारी रात्री उशिरा ५५ रुग्णांवरुन सातारा जिल्ह्यात ६९ इतके रुग्ण झाले. काय झाले नेमके, काेठे आढळले जादा रुग्ण वाचा सविस्तर

बेजाबदारपणामुळे कऱ्हाडची कोरोनाची साखळी सातारला पाेहचली ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com