लढा कोरोनाचा : काळजी करु नका, बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर आहे असे डाॅक्टरांनी सांगताच सर्वांचे चेहरे खूलले

लढा कोरोनाचा : काळजी करु नका, बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर आहे असे डाॅक्टरांनी सांगताच सर्वांचे चेहरे खूलले
Updated on

कऱ्हाड ः येथील कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी गलमेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथील कोरोनाबाधित गर्भवतीची प्रसूती सिझेरियनद्वारे यशस्वीपणे पार पाडल्याची घटना घडली. अशा प्रकारे कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती करण्याची ही पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाबाधित महिलेने  रविवारी दुपारी दोनच्या सुमारास बाळाला जन्म दिला आहे. त्याचे वजन पावणेतीन किलो इतके आहे. कोरोनाच्या साथीतही डॉक्‍टरांच्या अथक प्रयत्नातून बाळाचा जन्म झाला आहे. बाळ आणि बाळाच्या आईची प्रकृती सध्या स्थिर आहे.
 
मुंबईहून 15 दिवसांपूर्वी गलमेवाडी-कुंभारगाव येथे आलेल्या 24 वर्षीय गर्भवती महिलेत कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने तिला 22 मे रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिचा स्वॅब घेण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी 23 मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. तिच्यावर त्वरित कोरोनाच्या अनुषंगाने उपचार सुरू करण्यात आले. गर्भवतीवर स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. एन. एस. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. मनीषा लद्दड व डॉ. आशुतोष बहुलेकर यांनी स्वतंत्र उपचार सुरू केले. त्या महिलेचा गर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्याने तिला उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी तत्काळ तिची सिझेरियनव्दारे प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास तिची सिझेरियनद्वारे यशस्वीपणे प्रसूती केली.
 
कोरोनाबाधित महिलेची प्रसूती यशस्वी करण्यात डॉ. आशुतोष बहुलेकर, डॉ. रश्‍मीन साहू, डॉ. चिराग शर्मा, भूलतज्ज्ञ डॉ. माया कमलाकर, डॉ. निकिता लोले, डॉ. शालू शर्मा, बालरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. वाय. क्षीरसागर, डॉ. सोहम क्षीरसागर, डॉ. साबू इब्राहिम, डॉ. सुकेश, डॉ. दुर्गाप्रसाद, नर्स जयश्री विटकर यांच्यासह अन्य निवासी डॉक्‍टर्स व नर्सिंग स्टाफचा सहभाग होता. त्यांचे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी कौतुक केले. आता नवजात बालकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असून, त्याच्या अहवालाकडे साऱ्यांच्याच नजरा लागून आहेत. 

सातारा जिल्ह्यात चार हजार आयटीआयधारकांना राेजगाराची संधी; कृतीची आवश्यकता

सरकार आमचं नाही; काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील माेठ्या नेत्याची क्लिप व्हायरल

इथं नाकात कापूस भरायची वेळ आलीय अन्...नथीचा नखरा हाेताेय ट्रोल; युवतींचेही प्रत्युत्तर

कऱ्हाडकरांसाठी गुड न्यूज; पालिकेच्या पुढाकाराचा झाला गवगवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vedika Dake Mumbai Police success story
Muslim community prayer in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com