सरकार आमचं नाही; काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील माेठ्या नेत्याची क्लिप व्हायरल

सरकार आमचं नाही; काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील माेठ्या नेत्याची क्लिप व्हायरल
Updated on

कऱ्हाड ः मंत्रीमंडळात मी नाही, सरकार पण आमचं नाहीये. शिवसेनेचे सरकार आहे, अशा आशयाचा संवाद कॉंग्रेसचे आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि एका व्यक्तीचा झाल्याची एक ऑडिओ क्‍लिप आज (रविवार) समाज माध्यमातून व्हायरल झाली. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलेले कॉंग्रेसचे नेत्यांमध्ये नाराजी आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान या क्‍लिपबाबत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता त्यांनी फारसे काही न बोलता वेट ऍन्ड वाच अशी भुमिका मांडली.

आज (रविवार) दुपार पासून आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि एका व्यक्तीमधील दूरध्वनीवरील संवाद अनेकांच्या मोबाईलवर फॉरवर्ड होऊ लागला आहे. आमदार चव्हाण यांच्या संवाद साधणारी व्यक्ती त्याच्या भाषेवरुन विदर्भातील असावी असा अंदाज बांधला जात आहे. काही कामानिमित्त त्याव्यक्तीने चव्हाण यांना फोन केला असावा. त्यावेळी त्याने निधीचा विषय काढला. त्यावर आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणतात मी मंत्रीमंडळात नाही. सरकारही आमचं नाही. शिवसेनेचे सरकार आहे. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे होईल असे वाटत नाही. सध्या निधी सगळा परत घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये निधी सगळा परत घेतला आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणते बघा साहेब तुमचं नाव मोठं आहे, तुम्हांला भविष्यात संधी आहे असं कार्यकर्ता म्हणताच त्यावेळेला नाही दिली असे शब्द पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुखातून बाहेर पडताना ऐकू येतात. ही संवादाची क्‍लिप समाज माध्यमातून व्हायरल होऊ लागली आहे. दरम्यान याबाबत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फारसे काही न बोलता वेट ऍन्ड वॉच असे म्हटले आहे. 


सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा 

पृथ्वीराज चव्हाणांचे विचार स्तुत्यच; कॉंग्रेसचा पूर्णतः पाठिंबा

सातारा जिल्ह्यात चार हजार आयटीआयधारकांना राेजगाराची संधी; कृतीची आवश्यकता

मुंबई पुणेकरांना रोजगार हमीची संधी; कोट्यावधीची मजुरी जमा 

मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Political News
Sangli Municipal Corporation Recruitment
Krishna River Crocodile Sighting
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com