सातारा जिल्ह्यात रंगली साडेतीन लाख शौचालये

ZP-Satara
ZP-Satara

सातारा - निर्मलग्राम ते हागणदारीमुक्‍त जिल्हा येथपर्यंत मजल मारणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राबविलेल्या ‘स्वच्छ, सुंदर शौचालय’ स्पर्धेत (ग्रामीण) साताऱ्याने बाजी मारली. अंगणवाडी, शाळा, सार्वजनिक अशी तब्बल साडेतीन लाख शौचालये रंगवली. त्याद्वारे स्वच्छतेविषयकही संदेशही दिले. 

केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने एक ते ३१ जानेवारी दरम्यान देशभरातील ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर शौचालय’ स्पर्धा घेतली. देशातील ६१४ जिल्ह्यांमधील एक कोटी ३२ लाख प्रतिस्पर्ध्यांनी यात भाग घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून शौचालयांना आकर्षकरित्या रंगविण्यात आले व या शौचालयांवर स्वच्छता जागृतीबद्दल संदेशही देण्यात आले. स्थानिक पातळीवर झालेल्या कामाची नोंद मंत्रालयाच्या पोर्टलवर देण्यात आली. या आधारावर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जिल्ह्यांना भेट देवून पाहणी केली व विजेत्यांची निवड केली. 

साडेचार लाख शौचालये स्वच्छ, सुंदर करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला देशात दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रात २६ लाख ४८ हजार २६ शौचालये रंगविण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राला देशातून पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार दिला. स्वच्छतेत अग्रेसर असणाऱ्या सातारा जिल्ह्यानेही मोहर उमटवली. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील सात जिल्ह्यांमध्ये सातारा जिल्ह्याने स्थान मिळविले. जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख शौचालये रंगविण्यात आली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com