Cornonovirus : प्रत्येक सातारा जिल्हावासियांसाठी बातमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

सातारा : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील (शहरी व ग्रामीण)  भागातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने म्हणजेच किराणा, भाजीपाला,फळे, दूध, औषधे दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. यापुर्वीच्या आदेशात साेमवारी आणि गुरुवारी अन्य दुकाने सुुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली हाेती. ती रद्द झालेली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता म्हणजेच (कपडे, ज्वेलरी, हार्डवअेर अँड पेंटस्, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, शू मार्ट,बेकरी, स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने,  ब्युटी पार्लर, मेन्स पार्लर, ड्रायक्लिनरस्, बिल्डींग मटेरियल व इतर दुकाने चालू ठेवण्याच्या यादीत नमूद नसलेली इतर सर्व प्रकरची दुकाने) पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा2005 मधील तरतूदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फुयबाबत केलेल्या आवाहनाला सातारा जिल्ह्यात उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील एरवी गजबजलेले रस्ते व बाजारपेठ आज (रविवार) पूर्णपणे बंद होती. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. जिल्ह्यातील सर्व रस्ते पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून तपासणीसाठी बंद केले होते.

काळ्या पिवळ्या प्रवासी वाहतुकीच्या जीप  31 मार्च पर्यंत बंद

कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व  काळ्या पिवळ्या प्रवासी वाहतुकीच्या जीप  31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Coronavirus : सातारा : पाच काेराेना संशीयत रुग्ण जिल्हा रुग्णालयात

काेराेना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर घेतलेल्या निर्णयाची जवांनापर्यंत शेअर करुन पाेहचवा.

 सकाळ रिलीफ फंड : आवाहन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Administration Order For Shopkeepers