esakal | Coronavirus : सातारा : पाच काेराेना संशीयत रुग्ण जिल्हा रुग्णालयात
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : सातारा : पाच काेराेना संशीयत रुग्ण जिल्हा रुग्णालयात

तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Coronavirus : सातारा : पाच काेराेना संशीयत रुग्ण जिल्हा रुग्णालयात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा  :  सातार जिल्ह्यात काेराेना व्हायरस संशीयत पाच रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. बहामा, दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेला 27 वर्षीय युवक व काही वेळ त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र वय 24 वर्षे त्या दोघांनाही सर्दी व  खोकला असल्याने त्यांना शनिवारी (ता. 21 मार्च) रात्री 11 वाजता जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तसेच कतार येथून प्रवास करुन आलेला 24 वर्षीय युवक त्याला घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला शनिवारीच रात्री एक वाजता विलगीकरण कक्षात दाखल केले. दरम्यान यापूर्वी शुक्रवारी दुपारी बारा वाजता चिली येथून आलेल्या 24 वर्षीय युवकास व रात्री वाजता दुबई येथून आलेल्या 29 वर्षीय युवकास  दाखल करण्यात आले आहे. 

या पाचही रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांना कोरोना अनुमानित लक्षणे असल्याने त्यांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.  

हेही वाचा : सातारा : सैन्य दलातील जवानांच्या सुटीस मुदत वाढ 

जरुर वाचा : Coronavirus: संसर्गाची साखळी तोडा

वाचा : Coronavirus : सातारा जिल्ह्यातील सर्व पेट्राल पंप या दिवशी बंद राहणार 

अवश्य वाचा : सातारा : चिलीवरुन आलेला युवक जिल्हा रु्गणालयात दाखल

कैलास स्मशानभूमीत गर्दी टाळा

सातारा : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बालाजी ट्रस्टच्या देखभालीत असलेल्या कैलास स्मशानभूमीत जंतूनाशके फवारून काळजी घेतली जात आहे. तरी देखील तिथली गर्दी पूर्णपणे आटोक्‍यात आणलीच पाहिजे. याला पर्याय नाही.

तरी अंत्यविधी, तिसरा - सावडणे असले विधी असताना गर्दी होत आहे. वास्तविक, इथं भावना उफाळून आलेल्या असतात. गर्दी न करणे, प्रत्येकाने एकमेकांपासून किमान तीन फूट अंतर लांब उभारणे असले निकष इथे बंधनकारक करणे आवश्‍यक बनले आहे. त्यामुळे कैलास स्मशान भूमीमध्ये अत्यंविधी, तिसरा किंवा सावडणे या विधींसाठी गर्दी होणार नाही याची आप्तस्वकीयांनी काळजी घेतलीच पाहिजे. शिवाय जनतेनेही भावनेला आवर घालून राष्ट्रीय संकटाला महत्व द्यायला हवे असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.