esakal | पृथ्वीराज चव्हाणांचे विचार स्तुत्यच; कॉंग्रेसचा पूर्णतः पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज चव्हाणांचे विचार स्तुत्यच; कॉंग्रेसचा पूर्णतः पाठिंबा

आत्ताची देशाची आर्थिक स्थिती व कोरोनामुळे झालेल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे. 

पृथ्वीराज चव्हाणांचे विचार स्तुत्यच; कॉंग्रेसचा पूर्णतः पाठिंबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुसेगाव (जि. सातारा) ः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विविध देवस्थानांमधील सोने वापराबद्दल मांडलेले विचार स्तुत्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे. पृथ्वीराजबाबांच्या या विचारांना सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सूतोवाच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांनी करुन दाखवलं 
 
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सोन्याबद्दल पहिली योजना 1999 मध्ये गोल्ड डिपॉझिट स्कीम नावाने सुरू केली होती. त्यानंतर या योजनेचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्ड मॉनिटायजेशन या नावाने ही योजना सुरू केली. या स्कीमचा भाग म्हणूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध देवस्थानांमधील सोन्याबद्दल काही विचार मांडले आहेत. नोव्हेंबर 2015 ते 31 जानेवारी 2020 पर्यंत या योजनेंतर्गत 11 बॅंकांमध्ये 20.5 टन सोने जमा झाले आहे. आपल्या देशातील बरेचसे सोने हे व्यवहारात नाही, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अहवाल सांगतो. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील सोन्याचे योग्य नियोजन आणि विनिमय करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही सूचना केली होती. 

वास्तविक हे सोने कॉंग्रेस पक्षासाठी किंवा कोणा व्यक्तीसाठी नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागावा, यासाठी उपयोगात आणावे, असा विचार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला होता. परंतु, या चांगल्या सूचनांचा विचार करावयाचे सोडून काही लोकांकडून त्याचा विपर्यास केला गेला आहे. या गोष्टींबद्दल लोकांमध्ये विचारांची देवाण-घेवाण चालू होणे गरजेचे आहे. आत्ताची देशाची आर्थिक स्थिती व कोरोनामुळे झालेल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे. 

रुढी-विज्ञानवाद्यांमध्ये वादाला तोंड 

आता रुढीवादी व विज्ञानवादी यांच्यातील वादाला तोंड फुटले आहे. या रुढीवादी लोकांनीच महात्मा फुले यांच्यासारख्या अनेक थोर समाजसुधारकांना तसेच माऊली ज्ञानेश्वर यांच्यासारख्या अनेक महान संतांना त्रास दिला होता. अशाच रुढीवाद्यांनी देशाच्या सद्य:स्थितीत केलेल्या विधानांचा विपर्यास करून पृथ्वीराज चव्हाण यांना काशीच्या मंदिरप्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे, असेही डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले. 

सातारा : पावसाळा लांबल्यास पाणीटंचाई

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारींना कऱ्हाडला येण्याच्या आमंत्रणाचा निर्णय

जिल्हाधिकाऱ्यांचा शिक्षकांसाठी विशेष आदेश

सातारा : कोरोनामुळे आल्याचे दर ढासळले 

 

loading image