राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारींना कऱ्हाडला येण्याच्या आमंत्रणाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

लॉकडाउननंतर परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर नियमित दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात येईल. त्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना आमंत्रित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृष्णा विद्यापीठाने कळविले आहे. 

कऱ्हाड : लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने 21 मे रोजी व्हर्च्युअल वार्षिक दीक्षांत सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये 2019- 20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची पदवी प्रदान करण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे कळवण्यात आले आहे.
होम क्वारंटाईनचा नियम पाळा अन्यथा... 
 
कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाची बैठक व्हर्च्युअल पद्धतीने झाली. शासनाच्या नियमानुसार अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा झाल्यानंतर 180 दिवसांच्या आत दीक्षांत सोहळा घेऊन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणे आवश्‍यक असते. मात्र, कोरोनामुळे सोहळा आयोजित करता येत नाही. त्यामुळे विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनानुसार व्यवस्थापन मंडळाने 21 मे रोजी व्हर्च्युअल दीक्षांत सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लॉकडाउननंतर परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर नियमित दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात येईल. त्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना आमंत्रित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. त्या सोहळ्यात विद्यार्थ्यांना वैयक्तिक पदवी प्रदान आणि पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार, पदक आणि पारितोषिके देऊन सन्मान केला जाणार आहे, असे विद्यापीठाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

मायणीत कोरोनाचा शिरकाव; लाेणंद काळजीत; कऱ्हाडाची साखळी घट्टच

प्रेमीयुगुलांसह हौशे नवशे गवश्यांनी घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा

कऱ्हाड तालुक्याला सकाळ सकाळी हादरा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Governor Bhagat Singh Koshyari May Visit Karad