पृथ्वीराज चव्हाणांनी करुन दाखवलं

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

कोयना वसाहतीतील उद्योग सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यासंदर्भात उद्योजकांची मागणीही होती. उद्यापासुन कोयना वसाहतीतील उद्योग पुर्ववत सुरु होतील अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिले.

कऱ्हाड : कोयना औद्योगिक वसाहतीच्या थांबलेल्या चाकाला आधार देण्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना तेथील उद्योजकांनी साकडे घातले. त्यावर आमदार चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढला. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला असुन आजपासुन (बुधवार) कोयना वसाहतीतील उद्योग पुर्ववत सुरु होणार आहेत. त्यातुन एक हजार ८०० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे.

मलकापुर- आगाशिवनगर आणि अहिल्यानगरमध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्या परिसरात कंटेटमेंट झोनमध्ये समावेश झाला आहे. तेथे वनवासमाचीनंतर सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे त्या परिसरावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आली आहे. परिणामी मलकापुसरह तो परिसर पुर्णतः सील करण्याची कार्यवाही मध्यंतरी जिल्हाधिकारी यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी आता सु्क्ष्म कंटेटमेंट झोनची कार्यवाही सुरु केली. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्ण सापडले तो परिसरच सील करण्याची कार्यवाही आता सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इतर परिसर सील न करता तेथे सवलत दिली जात आहे. त्याचा संदर्भ घेवुन कोयना औद्योगिक वसाहतीतील उद्योजक उदय थोरात, अमोल जमदाडे, अभिजीत जगताप, अनिल सांडगे, किशोर जकाते आणि राजेश मोटे यांनी आमदार चव्हाण यांची भेट घेतली. 

उद्योजकांनी उद्योग बंद असल्याने त्यावर अवलंबुन असणाऱ्या एक हजार 800 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. त्यावर आमदार चव्हाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याशी चर्चा केली. त्यातुन शासन नियमांच्या अधीन राहून औद्योगिक वसाहत पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कोयना औद्योगीक वसाहतीतील उद्योग सुरु होणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या मजुरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर यावेळी उद्योजकांनी पीएफ पॅकेज आणि ईएसआय बद्दल आमदार चव्हाण यांच्याशी चर्चा केली. सरकारने पीएफ संबंधित दिलेले पॅकेज अपुरे असून सर्व उद्योजकांना ते लागू होत नाही. त्याचा सरकार दरबारी फेरविचार व्हावा आणि ईएसआय योजनेचा लाभ कऱ्हाडला मिळत नाही. तो होण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. उद्योग सुरु होणार असल्याने उद्योजकांनी आमदार चव्हाण आणि प्रशासनाचे आभार मानले.  

कोयना वसाहतीतील उद्योग सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यासंदर्भात उद्योजकांची मागणीही होती. उद्यापासुन कोयना वसाहतीतील उद्योग पुर्ववत सुरु होतील.

उत्तम दिघे, प्रांताधिकारी, कऱ्हाड

सातारा जिल्ह्यातील सैनिकांसाठी जाहीर आवाहन

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारींना कऱ्हाडला येण्याच्या आमंत्रणाचा निर्णय

ठाकरे सरकार लक्ष देईना; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत अश्रु

प्रेमीयुगुलांसह हौशे नवशे गवश्यांनी घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Green Signal For Koyna Industry