esakal | सख्खे शेजारी पण, वेशीवरुनच राम रामकरी

बोलून बातमी शोधा

सख्खे शेजारी पण, वेशीवरुनच राम रामकरी

कराडमध्ये कोणीही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर आता पर्यंत जिल्ह्यात तीन पेक्षा अधिक जणांवर कारवाई केली आहे. याबाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही तात्काळ कारवाई होईल असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

सख्खे शेजारी पण, वेशीवरुनच राम रामकरी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : एरव्ही एकमेकांना साथ देणारी गावे सध्यस्थिती तुम्ही आमच्याकडे येऊ नका आम्ही देखील तुमच्याकडे येत नाही अशी जणू गावाच्या वेशीवर दहशतच पसरवत आहेत की काय असे तुम्हांला वाटेल परंतु त्यांचे जे काही सर्व चालले आहे ते काळजीपाेटी. याबाबत ग्रामस्थांनी देखील दुजाेरा दिला. ते म्हणाले आपण एकमेकांनी एकमेंकाची काळजी घेतली तरच संकटातून बाहेर पडू.

सातारा जिल्ह्यात काेराेनाचे दाेन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे प्रत्येक गावात आता खबरदारी घेतली जात आहे. आपल्या गावात काेणी येऊ नये म्हणून चक्क गावच्या वेशी बंद करु लागले आहेत. काेण झाड आडवे लावत आहे तर काेण पाण्याच्या टाक्या एकूणच कोरोनाच्या धास्तीने सातारा जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये बाहेरच्या लाेकांनी येऊ नये यासाठी खटाटाेप सुरु आहे.
 

काटवली (ता जावळी) येथे बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आणि गावातील लोकांनी बाहेर न जाण्यासाठी प्रवेशद्वारावर झाडाची फांदी व दोरखंडाच्या साह्याने बंदोबस्त करण्यात आला आहे.भरतगाववाडी (ता.सातारा) येथे बाहेरील लोकांना गावबंदी केली आहे. भोगवली तर्फ मेढा (ता. जावळी) येथे बाहेरच्या गावातील नागरिकांनी गावात येऊ नये यासाठी प्रवेश बंद केला आहे. केसकरवाडी (ता. जावळी) देखील गाव बंदी करण्यात आली आहे.
(क) वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या कुसुंबी गावामध्ये देखील गावबंदी करण्यात आली आहे.

म्हसवड येथे कोरोना साथीचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी म्हसवड पालिकेने शहरातील बाजार पेठेतील प्रत्येक दुकाने रस्ते व मंदीरे जंतू नाशकाची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन स्वच्छ ठेवण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

नागरिकांना पेट्राेल, डिझेल मिळणार नाही; काेणाला मिळणार वाचा सविस्तर

मोठी बातमी : महाराष्ट्रात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी...

कराडमध्ये कोणीही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर आता पर्यंत जिल्ह्यात तीन पेक्षा अधिक जणांवर कारवाई केली आहे. याबाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही तात्काळ कारवाई होईल असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.