Video : इमर्जन्सी पेशंट...धावाधाव...त्यात डाॅक्टरांची अट...घाबरगुंडी...पुढे काय घडले वाचा

Sneak treatment
Sneak treatment
Updated on

गोंदवले (जि. सातारा) : भर दुपारी तीनची वेळ... वैद्यकीय अधिकारी नुकतेच विसावलेले... मात्र, इमर्जन्सी पेशंट आल्याची वर्दी मिळताच सर्वत्र धावाधाव सुरू झाली... जखमी पेशंट पाहून सुरुवातीला घाबरगुंडी उडाली खरी; पण अवघ्या काही मिनिटांतच ऑपरेशन सक्‍सेस झाले. चक्क जखमी सर्पाला जीवदान दिल्याचा आनंद कलेढोणच्या ग्रामीण रुग्णालयातील सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला.
 
ही काहीशी अतिशयोक्तीपर कथा वाटावी, असा प्रसंग साेमवारी (ता.11) दुपारी कलेढोण (ता. खटाव) येथील ग्रामीण रुग्णालयात घडला. सर्पमित्र महेश बाबर यांना गारळेवाडीच्या माळरानात एका झाडावर धामण जातीचा सर्प जखमी अवस्थेत दिसला. तातडीने या धामणीला जीवदान देण्यासाठी महेश यांनी हालचाली सुरू केल्या. या सापाचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी जवळच्याच ग्रामीण रुग्णालय गाठले. सकाळपासून रुग्ण तपासण्या उरकून थोडंस रिलॅक्‍स झालेल्या डॉ. तांबोळी यांना कर्मचाऱ्यांनी तातडीने बोलवले. डॉ तांबोळीनी वेळ न दवडता रुग्ण तपासणीसाठी धाव घेतली खरी; परंतु जखमी रुग्ण हा मनुष्य नसून चक्क साप आहे, हे पाहून त्यांचीही घाबरगुंडी उडाली; परंतु "रुग्ण सेवा, हीच ईश्वर सेवा' असल्याने त्यांनी जखमी सापावर उपचार करण्याची तयारी दाखवली. मात्र, डॉक्‍टरांची एकच अट होती ती म्हणजे उपचार होईपर्यंत सापाचे तोंड महेश यांनी धरून ठेवायचे. रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ लगेच कामाला लागला. ऑपरेशनची तयारी करण्यात आली.
 
सापाची जखम स्वच्छ करण्यात आली. साधारण तीन इंच जखम असल्याने टाके घालावे लागणार होते. लगेच तीही व्यवस्था करण्यात आली. अखेर अवघ्या काही मिनिटांतच जखमी सापाच्या जखमेवर टाके टाकून मलमपट्टी करण्यात आली. ऑपरेशन सक्‍सेस झाले. सापाला जीवदान दिल्याचा आनंद सर्पमित्र महेश बाबरसह डॉ. तांबोळी व त्यांना सहकार्य करणाऱ्या डॉ. अमोल देशमुख, डॉ. विलास जाधव, योगिता चन्ने यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सापाची जखम शिवून उपचार करण्यात आले असले, तरी आणखी काही दिवस त्याच्यावर उपचार करूनच त्याला रानात सोडण्यात येईल, असे महेश बाबर यांनी सांगितले. 

पहिल्यांदाच आज जखमी सापावर उपचार करण्याची वेळ आली; परंतु धाडस करून उपचार करून त्या सापाचा जीव वाचवू शकलो, याचे खूप समाधान मिळाले. 
- डॉ. समीर तांबोळी, वैद्यकीय अधीक्षक, कलेढोण 


मी सर्पमित्र असल्याने नेहमीच सर्व जातीच्या सापाना जीवदान देतो; परंतु आज एका जखमी सापावर उपचार करून जीवदान दिल्याचा वेगळाच आनंद होतोय. 
- महेश बाबर, सर्पमित्र, कलेढोण 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com