esakal | गणपती बाप्पांच्या माध्यमातून चालून आलीय सुवर्णसंधी
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती बाप्पांच्या माध्यमातून चालून आलीय सुवर्णसंधी

गणेशाेत्सवापुर्वी बाहेरच्या कलाकारांना कोरोनामुळे पुन्हा सातारा जिल्ह्यात येता येणार नाही. त्यामुळे स्थानिक कलाकारांना यानिमित्ताने संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या स्थानिक कलाकारांशी संवाद साधून त्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्‍यक आहे.

गणपती बाप्पांच्या माध्यमातून चालून आलीय सुवर्णसंधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः यंदा कोरोनामुळे राजस्थान, उत्तरप्रदेश व गुजरातमधून येणाऱ्या गणेशमूर्तींचे प्रमाण कमी राहणार आहे. पर्यायाने आपल्याकडील स्थानिक मूर्तीकारांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनासोबतच आता जिल्हा प्रशासनाला पाणी प्रदूषण रोखण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना पर्याय म्हणून माती किंवा शाडूच्या मूर्ती बसविण्याबाबतच्या जागृतीवर भर द्यावा लागणार आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

प्रत्येक वर्षी गणेशोत्सव जवळ आला की जिल्हा प्रशासन व पालिकेला पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची आठवण होते. पण, अशा गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच प्राधान्य दिले जाते. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे सर्व काही बंद असल्याने हवा, पाणी प्रदूषण पातळी झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ही परिस्थिती बदलणार असल्याने पुन्हा पाणी व हवेचे प्रदूषण वाढू नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

गेल्यावर्षीपासून जिल्हा प्रशासन व नगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी जागृती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद मिळत असला तरी शाडू किंवा मातीच्या गणेशमूर्ती उपलब्धतेचे प्रमाण कमी आहे. सध्या 70 टक्के लोक प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. उर्वरित 30 टक्के लोक पर्यावरणपूरकतेची कास धरतात. हे प्रमाण वाढण्यासाठी आतापासूनच जागृतीची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात राज्यांतून येणाऱ्या गणेश मूर्ती व ते विक्री करणारे व्यावसायिक आपल्या घरी निघून गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी प्रमाणात उपलब्ध असतील, तर स्थानिक कलाकारांना यातून संधी निर्माण झाली असून, त्यांनी ही पर्यावरणपूरकतेची कास धरून आतापासून कच्चा माल उपलब्ध करून शाडू व मातीच्या गणेशमूर्तींना प्रधान्य द्यायला हवे आहे.

जिल्ह्यात अडीच ते तीन हजार गणेश मंडळे आहेत. ही मंडळे एक 20 ते 25 फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. काही मंडळांच्या मूर्ती विसर्जन न करता त्याला रंगरंगोटी करून पुन्हा वापरतात. या मूर्तीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच असतात. तसेच इतर मंडळेही बाहेरच्या कलाकारांकडून मूर्ती विकत घेतात. पण, या वर्षी बाहेरच्या कलाकारांना कोरोनामुळे पुन्हा जिल्ह्यात येता येणार नाही. त्यामुळे स्थानिक कलाकारांना यानिमित्ताने संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या स्थानिक कलाकारांशी संवाद साधून त्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्‍यक आहे.
 

  • गणेश मंडळे : अडीच ते तीन हजार 
  • पाच फुटांपर्यंत मूर्ती बसविणारी मंडळे : दीड ते दोन हजार 
  • मोठ्या मूर्ती बसविणारी मंडळे : दोनशे 
  • यावर्षी उपलब्ध होणाऱ्या मूर्ती : 60 टक्के 

कंत्राटी डॉक्‍टरांचा राज्य सरकारला इशारा

ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळीच विवाह झाला अन् नवदाम्पत्याने मंदिरातच...

गणपतीबाप्पा... कसं रे होणार..! 

Video : भक्तांनो सावधान...माजी मुख्यमंत्री म्हणतात आता तुमच्यावर कारवाईच करतो