Video : हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत जमीनदोस्त; लाखोंच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल

Video : हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत जमीनदोस्त; लाखोंच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल

कऱ्हाड ः दोन दिवासांपासून वाऱ्यासह सुरू असलेल्या वादळी पावसासह गारांमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन काढणीच्या हंगामातच पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे. 

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतात उपलब्ध असलेला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यास धडपडत आहेत. मात्र, तरीही अनेक शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत आणता न आल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जे शेतकरी मार्केटमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणतात, त्यांना तो माल बाजारपेठेत विकला जाईलच याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे जो विकेल तो विकेल आणि राहिलेला माल तेथेच सोडून यावे लागत आहे. या चक्रव्यूहात सध्या शेतकरी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. एकीकडे हे चित्र असतानाच शेतकऱ्यांवर अस्मानी संकटानेही घाला घातला आहे. दोन दिवासांपासून वाऱ्यासह सुरू असलेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील विविध भागात धुमाकुळ घातला आहे. वादळी वारा व गारांसह होत असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून चार पैसे मिळतील, या हेतूने घेतलेली हातातोंडाशी आलेली आंबा, कलिंगड, फणस यासह दोडका, काकडी, टोमॅटो, कारले ही पिके वाया गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या काढणीच्या हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांत शेतीपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.
 
वादळी पावसापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. काही ठिकाणी झाडे वाहनांवर पडून वाहनांचेही नुकसान झाले आहे. ज्यांचे घरांचे पत्रे उडले आहेत, त्यांच्यापुढे उघडा पडलेला संसार सावरण्याचे आव्हानच उभे आहे. आज अनेकांनी उडालेले पत्रे एकत्र करून ती घरावर झाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, घरे सावरण्याचे त्यांच्यापुढे संकटच आहे. 
लॉकडाउनने शेतीपिके धोक्‍यात आली आहेत. त्यातच वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तोडणीस आलेली भाजीपाल्याची व पालेभाज्यांची पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. त्यातून सावरण्यासाठी शासनाने अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या, फळांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

महाराष्ट्रातील या अडचणी दूर व्हाव्यात; काँग्रेस समितीच्या टास्क फोर्सची मागणी 

Coronavirus : लोकप्रतिनिधीही घरातच थांबून; दोनच आमदारांनी सुचविली विकासकामे 

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी माजी सैनिकाचा पुढाकार

ग्राहकांच्या साेयीसाठी आणि महावितरणला मदत हाेईल अशा प्रकारे एकमेकांना साह्य करण्याची आत्ताच वेळ आहे. सविस्तर जाणून घ्या 








वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. त्यामध्ये दोडका, कलिंगड, आंब्यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी सरकारने आम्हाला भरपाई द्यावी. 
धोंडिराम कोळेकर, शेतकरी, कळकेवाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com