सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

कराडजवळ महामार्गालगत असलेल्या नमस्कार हॉटेल समोर बुधवारी रात्री अजय पावसरकर यांच्यावरगोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर केले.

सातारा - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे बंधू आणि हिंदू एकता आंदोलनाचे युवा कायकर्ते अजय पावसकर यांच्यावर बुधवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यातून ते थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, कराडजवळ महामार्गालगत असलेल्या नमस्कार हॉटेल समोर बुधवारी रात्री अजय पावसरकर यांच्यावरगोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी पाच राऊंड फायर केले. त्यातील तीन गोळ्या झाडावर लागल्या तर दोन गोळ्या त्यांनी चुकवल्या. त्यामुळे अजय पावसकर बचावले. गोळीबाराच्या घटनेनंतर पावसकर समर्थकांनी कराड शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

Web Title: Satara: Firing of BJP district president's brother