धक्कादायक : सातारा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जण कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

एन.सी.सी.एस पुणे यांच्याकडील अहवलानुसार  91 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आज (मंगळवार)  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

खटाव : गादेवाडी (ता. खटाव) येथील सासरे व जावई यांचा नुकताच कोरोनाचा पाठविलेला पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर आता त्याच कुटुंबातील भाऊ, भावजय व मुलगी या तिघांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गादेवाडी व परिसरासह खटाव तालुका पुन्हा एकदा हादरून गेला आहे. संबंधित कुटुंब शनिवारी (ता.16) मुंबई (कोपरखैरणे) येथून गावी आले होते. त्यापैकी सासरे व जावई यांना त्रास होऊ लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात ते तपासणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले असता, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन अलर्ट झाले होते.

त्याच दिवशी रात्री अकरा वाजता गादेवाडी येथे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, खटावच्या तहसीलदार अर्चना पाटील तसेच सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वजित घोडके यांनी तातडीने दाखल होऊन कुटुंबातील इतर चौघांना कोरेगाव येथे स्वॅब तपासणीसाठी पाठवले. आता त्याच कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गादेवाडीत धास्ती वाढली आहे. यासंदर्भात उपसरपंच प्रमोद गायकवाड यांनी माहिती दिली की, नुकत्याच आलेल्या अहवालानुसार त्याच कुटुंबातील भाऊ (वय 57), भावजय (वय 55) व मुलगी (वय 28) हे तिघे बाधित झाले आहेत. अगोदरच्या बाधितांच्या अहवालाने परिसर हादरून गेलेला असताना, आता दुसऱ्या अहवालाने ग्रामस्थांमध्ये आणखीनच धास्ती वाढली आहे. सर्वत्र सन्नाटा पसरला आहे. 

दरम्यान एन.सी.सी.एस पुणे यांच्याकडील अहवलानुसार  91 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आज (मंगळवार)  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. साेमवारी रात्री ता. 25 रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 14 व कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 33 असे एकूण 47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली  आहे.

Video : होम क्वारंटाईनचा नियम पाळा अन्यथा... 

चला देश सेवेचा विडा उचलूयांत ! काेराेना याेद्धा बनण्याकरिताची ही आहे पात्रता

Video : मृतदेह घरातच ठेवणारे अर्णवचे आई-बाबा असे का वागले?

म्हाते खुर्द : अखेर अर्णवच्या मृत्यूचे कारण सहायक पोलिस निरीक्षकांनी कळविले 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Five Family Members Tested Covid 19 Positive In Khatav