म्हाते खुर्द : अखेर अर्णवच्या मृत्यूचे कारण सहायक पोलिस निरीक्षकांनी कळविले

म्हाते खुर्द : अखेर अर्णवच्या मृत्यूचे कारण सहायक पोलिस निरीक्षकांनी कळविले

मेढा (जि.सातारा) : म्हाते खुर्द येथील आर्यन (अर्णव) दळवी याच्या बहुचर्चित मृत्यू प्रकरणावर नुकताच पडदा पडला. मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू निमोनियाचा ताप व अशक्‍तपणामुळे झाल्याचे पुढे आले आहे.
 
याबाबत श्री. राठोड म्हणाले, की रविवारी (ता. 17) म्हाते खुर्द (ता. जावळी) येथे मुलाचा मृत्यू झाल्याबाबत माहिती मिळाल्याने येथील पोलिस स्टाफ तत्काळ तेथे पोचला. तेथे आर्यन जयवंत दळवी (वय 16, रा. म्हाते खुर्द) हा मृत व सडलेल्या अवस्थेत त्याच्या राहत्या घरात मिळून आला. त्याचा भाऊ श्रेयस दळवी याने मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आर्यन याच्या मृत्यूबाबत त्याचे वडील जयवंत दळवी, भाऊ श्रेयस दळवी व आई जनाबाई दळवी यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सांगितले, की सप्टेंबर 2019 मध्ये आर्यन शाळेत शास्त्रीय प्रात्यक्षिक करत असताना, त्याने केमिकलच्या बाटलीचे झाकण उघडल्याने त्याची वाफ त्याच्या नाका तोंडात गेली होती. तेव्हापासून त्यास ताप येणे, अंग दुखणे, उलटी होणे, भूक न लागणे असा त्रास सुरू झाला होता. त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू होते. आम्ही 12 वर्षांपासून गावी आलो नव्हतो; परंतु सध्या कोविड-19 आजाराचा प्रसार होत असल्याने ता. 26 मार्चला म्हाते खुर्द येथे आलो.
 
जानेवारीपासून आर्यनला खूप त्रास होत होता. तो जेवण करत नव्हता. फक्त ज्यूस पित होता. गावी आल्यापासून तो ज्यूस व भाताची पेजच घ्यायचा. तो चिडचिडा झाला होता. तो जास्त झोपायचा. सर्व विधी जागेवरच करत होता. तो दोन- दोन दिवस झोपून असायचा. घरातील लोक त्यास उठवण्यास गेल्यास तो चिडून अंगावर येत होता. शुक्रवारी (ता. 15 मे) दुपारी त्यास त्याच्या वडिलांनी व भावाने ज्यूस पिण्यास दिला होता. ज्यूस पिल्यानंतर तो झोपला होता व रविवारी (ता. 17 मे) रोजी घरात कुबट वास येत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याच्या तोंडावरील चादर काढून पाहिले असता तो मृतावस्थेत आढळला. त्याचे तोंड काळे पडले होते. त्याचे शरीरही सडत चालले होते. त्याबाबत आर्यनचा भाऊ श्रेयसने त्याचे चुलते अंकुश दळवी यांना कळविल्यानंतर ते म्हाते खुर्द गावी आले आणि त्यांनी सरपंच, पोलिस पाटील, वैद्यकीय अधिकारी यांना आर्यनचा मृत्यू झाल्याचे कळविले होते. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी म्हाते खुर्द गावी येऊन आर्यन याच्या मृतदेहाची पाहणी केली होती.

मग अर्णवचा मृत्यू कशामुळे ?

Video : एक टाळी विशेष मुलांसाठी वाजलीच पाहिजे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com