सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी 'या' साठी पुढाकार घ्यावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

गणेशोत्सवातील खर्चात कपात करून तो निधी शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी मदत म्हणून वापरला जाणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लवकरच शांतता समिती व गणेशोत्सव मंडळ, तसेच सर्व मूर्तिकार यांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत.

सातारा : कोरोनाचे संकट असल्याने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून सप्ततारा सांस्कृतिक मंडळ व मित्रसमूह आपली परंपरा जोपासणार आहे. मंडळाकडून कोरोनाच्या लढ्याला मदत केली जाणार आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे यांनी दिली.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात साधेपणाने गणेशोत्सव व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या वेळी गोडसे बोलत होत्या. या वेळी प्रकाश मंडळाचे श्रीकांत शेटे, सम्राट मंडळाचे शंभू तांबोळी, चैतन्य मोहिते, गणेश दुबळे, राजू गोडसे आदी उपस्थित होते. गोडसे म्हणाल्या, ""कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबई येथे यावर्षी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय अगोदरच झाला आहे. त्याच धर्तीवर सातारा शहरातही सप्ततारा सांस्कृतिक मंडळ व मित्र समूहाने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या गणेशोत्सवातील खर्चात कपात करून तो निधी शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी मदत म्हणून वापरला जाणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लवकरच शांतता समिती व गणेशोत्सव मंडळ, तसेच सर्व मूर्तिकार यांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल, असे सांगितले. राजू गोडसे म्हणाले, ""सप्ततारा सांस्कृतिक मंडळ गेली अनेक वर्षे मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा करते. यंदा कोरोनाच्या साथीमुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.'' 

श्री. शेटे म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून अनावश्‍यक खर्चाला फाटा दिला पाहिजे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी छोट्या मूर्तीची स्थापना करावी.'' शंभू तांबोळी म्हणाले, ""आम्ही यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार असून, कोणत्याही प्रकारची रोषणाई अथवा मोठे धार्मिक विधी केले जाणार नाहीत.'' 

कधी...काेठून...काेठे....बस धावणार जाणून घ्या सविस्तर बसचे सविस्तर वेळापत्रक

रेशनिंग दुकानदारांचा सरकारला इशारा

पृथ्वीराज चव्हाणांचे देंवेद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज; नेत्यांत जुंपणार ?

क्वारंटाइनमुळे उजळले शाळेचे भाग्य; साबळेवाडीतील कुटुंबियांचे श्रमदान 

म्हाते खुर्द : अखेर अर्णवच्या मृत्यूचे कारण सहायक पोलिस निरीक्षकांनी कळविले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Ganesh Mandal Took Lead To Celebreate Ganeshotsav Simple