मायणीत कोरोनाचा शिरकाव; लाेणंद काळजीत; कऱ्हाडाची साखळी घट्टच

मायणीत कोरोनाचा शिरकाव; लाेणंद काळजीत; कऱ्हाडाची साखळी घट्टच
Updated on

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेला लोणंद येथे मुंबई येथून प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी (ता. खटाव) येथील अकोला येथून प्रवास करुन ओलेले 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे म्हासोली गावातील कोविड बाधित रुग्णाचे निकट सहवासित दोन पुरुष अनुक्रमे 45 व 62 वर्षे आणि तीन महिला अनुक्रमे 48, 35 व 60 वर्षे असे एकूण आठ जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
ठाकरे सरकार लक्ष देईना; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत अश्रु

मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेली 58 वर्षीय खंडाळा येथील एका महिलेचा अहवाल कोविड बाधित आल्याने या महिलेला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर मुंबई येथे उपचार झाल्याने तीची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिल्ह्यात गणाना केली जाणार नाही असे कळविण्यात आले आहे. मायणी येथील दांपत्य हे होम क्वारंटाइन हाेते. त्यांचा कोरोना रिपोर्ट आज (मंगळवार) सकाळी पॉझिटिव्ह आला. गलाई व्यवसाय करणारे कुटुंब अकोल्यावरुन येथे १० मे रोजी दाखल झाले होते.
 
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. साेमवारी (ता. 18) रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील विलगीकरण कक्षात  32 जणांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 146 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 71 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 73 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

कऱ्हाड तालुक्याला सकाळ सकाळी हादरा

अंत्यसंस्कारासाठी स्माशनभूमीत जाण्यापुर्वी हे वाचा...

अरे वाऽऽऽ आता बिनधास्तपणे न्याहाळा 'ते' सौंदर्य
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra IT Park investment project
Atpadi Illegal Sand Mining
Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
How to apply for MHADA Sangli housing?
Marathi News Esakal
www.esakal.com