सातारा - कोल्हापूर पॅसेंजर 1 मेपासून पूवर्वत 

सातारा - कोल्हापूर पॅसेंजर 1 मेपासून पूवर्वत 

सांगली - गेल्या महिन्याभरापासून हातकणंगलेपर्यंतच धावणारी सातारा - कोल्हापूर पॅसेंजर एक मेपासून नियमित स्वरुपात कोल्हापुरपर्यंत जाईल. यामुळे सांगली-कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील हजारो प्रवाशांची होणारी गैरसोय दुर होणार आहे. गेल्या महिन्याभरात रेल्वेअभावी प्रवाशांना पैसा, वेळ आणि मनस्ताप यांना सामारे जावे लागले. 

सकाळी साडेआठ वाजता मिरजमधून निघणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजर म्हणजे तीन जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी जीवनवाहीनीच आहे. मुंबईच्या लोकलप्रमाणे अधिक गर्दी या पॅसेंजरला असते. गाडीची प्रवाशीक्षमता सुमारे हजारभर असताना दोन हजारांपेक्षाही अधिक प्रवाशी प्रवास करतात. कोल्हापुरला देवदर्शन, नोकरी, व्यवसाय, शिक्षण व अन्य कामानिमित्त जाणाऱ्यांसाठी ती हक्काची आहे. कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न ही गाडी देते. 

सध्या पुणे - मिरज - कोल्हापूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गतीने सुरु आहे. त्यातील मिरज ते कोल्हापूर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी या गाडीच्या प्रवासात खंड पडला होता. ती हातकणंगलेपर्यंतच सोडली जात होती. सुरुवातीला पंधरा दिवसांसाठी हातकणंगलेपर्यंत सोडण्याचे नियोजन होते; ते पुढे आणखी पंधरा दिवस वाढवण्यात आले. प्रवाशांना हातकणंगलेत उतरुन बस किंवा अन्य वाहनांनी कोल्हापूर गाठावे लागत होते. यामुळे आर्थिक फटका तर बसत होताच; शिवाय वेळही वाया जात होता. विद्युतीकरणासंदर्भातील कामे पूर्ण झाल्याने आता ब्लॉक संपणार आहे. त्यामुळे गाडी पुन्हा कोल्हापुरपर्यंत सोडण्यात येईल. याबाबतचा अधिकृत निर्णय एक-दोन दिवसांत जाहीर होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com