सातारा जिल्ह्यातील सैनिकांसाठी जाहीर आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

कोणीही कंटेनमेंट (प्रतिबंधित) क्षेत्रातून कॅन्टीनला येऊ नये. असे कोणी आढळल्यास त्याचे कार्ड जप्त करण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रत्येकाने शारीरिक अंतर राखावे, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले आहे. 

सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मिलिटरी कॅंटीनला होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी तालुक्‍यांसाठी दिवस ठरवून दिले आहेत. त्यानुसारच माजी सैनिकांनी कॅंटीनला येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ऋषी कपूर म्हणजे जॉली माणूस...

 
याबाबत दिलेल्या पत्रकानुसार जावळी, महाबळेश्‍वर, खंडाळा व सातारा तालुक्‍यांसाठी आजपासून (मंगळवार ता.19) ते 21 मे, खटाव, माण, पाटण, फलटण, वाई, कोरेगाव तालुक्‍यांसाठी 22 ते 25 मे, महाड, फलटण, वेळापूर, वाई, कोरेगाव तालुक्‍यांसाठी 26 ते 29 तर, वरील तारखांना ज्यांना येणे शक्‍य होणार नाही तसेच सुटीवर आलेल्या जवानांसाठी 30 व 31 मे ही तारीख ठेवण्यात आली आहे.

कॅन्टीनमध्ये सकाळी नऊपासून ग्रोसरी तर, दहा वाजल्यापासून मद्यविक्री होणार आहे. कोणीही साडेसातपूर्वी कॅंटीनमध्ये येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर 60 वर्षांवरील व्यक्तींना कॅन्टीनला येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपल्या प्रतिनिधीला ओळखपत्र, मद्य परवाना व कार्ड घेऊन पाठवावे. परंतु, कोणीही कंटेनमेंट (प्रतिबंधित) क्षेत्रातून कॅन्टीनला येऊ नये. असे कोणी आढळल्यास त्याचे कार्ड जप्त करण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रत्येकाने शारीरिक अंतर राखावे, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले आहे.

कऱ्हाड शहराची चिंता वाढवणारा असा आहे ग्राऊंड रिपाेर्ट

प्रसूतीनंतर ती एकटीच चालत निघाली गावाकडे

एका चोरीची अजब चर्चा; पोलिसांसमोरही आव्हान

अशीही आठवण : इरफानच्या विनंतीवरुन टाळली पाेलिसी कारवाई
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Military Canteen Working Days