एका चोरीची अजब चर्चा; पोलिसांसमोरही आव्हान

एका चोरीची अजब चर्चा; पोलिसांसमोरही आव्हान
Updated on

पिंपोडे बुद्रुक (जि.सातारा) : सोळशी (ता.कोरेगाव) येथे काल मध्यरात्री झालेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी चक्क शासनमान्य स्वस्त धान्य दुकानाचे स्टॉक व विक्री रजिस्टर गायब केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या चोरीत ५७ हजार रुपयांचा ऐवजही लंपास करण्यात आला असून या अजब चोरीची चर्चा दिवसभर विभागात सुरू होती.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की गावाच्या पूर्वेला पेठ परिसरात संजय उगले यांचे घर आहे. गावातील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना दहिगाव येथील व्यक्तीच्या नावावर असून आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांच्या सोयीकरिता सध्या हे दुकान संजय उगले चालवत आहेत. (शनिवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी श्री. उगले यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा काढून आत प्रवेश केला. यावेळी रोख दहा हजार रुपये, सात हजार रुपये किमतीचे चार मोबाईल हँडसेट, ३० हजार रुपये किमतीचा राणीहार, दहा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याच्या दोन नथी, सोन्याची दोन कर्णफुले व सोन्याचे चार बदाम असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी चोरट्यांनी चक्क स्वस्त धान्य दुकानाचे स्टॉक व विक्री रजिस्टर तसेच दुकानाचा परवानाही गायब केला आहे. याबाबत संजय उगले यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीला गेलेल्या ऐवजासोबतच स्वस्त धान्य दुकानाचे रजिस्टर आणि परवाना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील अधिक तपास करत आहेत.

...म्हणून त्यांच्यासह सर्वांवर आलेली हीच ती वाईट वेळ; सातारा जिल्हावासियांची भावना

'त्या' महिलेच्या घरातून कोरोनाही बाहेर पडेना 

नोटाबंदी, जीएसटीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या साठीही हट्टीपणा : पृथ्वीराज चव्हाण

कोरोनाबाधीतेची रुग्णालयात हेळसांड; नातेवाईकांचा उद्रेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur contractor bribery allegations
Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Satej Patil Supports Farmers in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com