ऋषी कपूर म्हणजे जॉली माणूस...

ऋषी कपूर म्हणजे जॉली माणूस...

कऱ्हाड ः ऋषी कपूर म्हणजे जॉली माणूस, 1990 मध्ये म्हणजे सुमारे तीस वर्षापूर्वी लंडनमध्ये त्यांची भेट झाली होती. भारतवासीय म्हणून आम्ही एकत्र येवून पाऊण तास मारलेल्या गप्पातून त्यांचा आपलेपणा अधिक भावला होता. असा जॉली, चतुरस्त्र अभिनेत्याच्या एक्झीटने लंडनमधील आठवणींना उजाळा मिळाला, असे येथील उद्योजक व माजी नगरसेवक बापूसाहेब मोरे सांगत होते. ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांनी तीस वर्षापूर्वी लंडन येथे काही काळ घालवला होता. त्यांच्या निधनाने आज त्यांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या. 

श्री. मोरे माजी नगरसेवक आहेत. त्यांचा कोल्हापूर व कऱ्हाड येथे मोरे आणि कंपनी नावाने उद्योग आहेत. नेहमीच विविध दौऱ्यावर ते असतात. सुमारे तीस वर्षापूर्वी जानेवारी 1990 मध्ये लंडन येथे एका व्यावसायिक ट्रेड फेअरला गेले होते. लंडन तसे त्यांच्यासाठी नवीन होते. महाराष्ट्रातून ते एकटेच होते. त्यांच्यासबोत दिल्लीचे त्यांचे मित्र मिश्राही सोबत होते. ट्रेडफेअर तीन दिवस होता. त्यासाठी ते एक दिवस आधी तेथे गेले होते. दोन दिवस ते ट्रेडफेअरमध्ये ते सहभागी झाले. त्यांनतर मित्रांसमवेत लंडन फिरण्याचे त्यांचा बेत होता. त्यासाठी त्यांनी एक दिवस राखीव ठेवला होता. ट्रेडफेअर आटोपून ते सायंकाळी एका कॉपी शॉमध्ये कॉपी घेत असतानाच त्यांना त्या शॉप बाहेर ऋषीकपूर यांच्यासारखी व्यक्ती दिसली. देशातून बाहेर लंडनला आल्यानंतर भारतीय अभिनेता दिसल्याने श्री. मोरे यांना आनंद झाला. त्यांनी त्वरीत बाहेर जावून ऋषीकपूर यांच्याशी संवाद साधला. 

श्री. मोरे पहिल्यांचा अर्थात त्यांच्याशी बोलताना थोडेसे घाबरले होते. मात्र ऋषीकपूर यांना ते लोक भारतातून आल्याचे कळताच त्यांनीच त्यांच्याच गोड शैलीत अरे व्वा करत त्यांना कवेत घेतले. त्यांनी त्यांची विचारपूस केली. कशासाठी आला आहात, असेही विचारले. ट्रेडफेअर सांगताच ते खूष झाले. त्यानंतर बराच वेळ त्यांच्याशी गप्पा झाल्या. ऋषीकपूर भेटल्याचा आम्हाल आनंद जालाच होता. तसा तो त्यांनाही झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते, असे श्री. मेरे यांनी सांगितले. ते म्हणाले, किमान पाऊण तास आम्ही ऋषीकपूर यांच्याशी गप्पा मारल्या. शुटींग निमित्ताने ते लंडननला आले होते. त्यांच्याशी गप्पा मारताना स्वभाव मृदू असल्याचे जाणवले. त्यांनी बाजारपेठेची माहिती दिली. कोठे काय मिळते. काय खरेदी करा, याची माहिती देताना त्यांनी पाऊण तसाच्या कालवधीत दाखवलेला आपलेपणा आजही आमच्यासाटी ताजाच आहे. तो जसा आहे, तसाच आठवतो. अशा अभिनेत्याची झालेली एक्झीट अत्यंत दुःखदायक वाटते.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे ६७ व्या वर्षी निधन

ऋषी-नीतू यांची कमाल लव्हस्टोरी, पॅरिसहून पाठवला होता ऋषी यांनी टेलिग्राम

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी  
क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com