Coronavirus : कऱ्हाडात कशामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले वाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पोलिस अधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा केली. लॉकडाउनला चांगले सहकार्य केल्याबद्दल सर्व सातारकरांचे कौतुक करतानाच त्यांनी बंदोबस्त चोख ठेवल्याबद्दल पोलिस प्रशासनाचेही त्यांनी कौतुक केले. सातारा शहरात बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर व गोरगरीब लोकांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटस्‌ची आवश्‍यकता असल्याचे तहसीलदार होळकर यांनी सांगितले.

सातारा ः जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या निम्मे रुग्ण कऱ्हाड तालुक्‍यात आहेत. मुंबईहून आलेल्या लोकांच्या जेथे जास्त संपर्क, तेथे अधिक रुग्ण संख्या दिसत आहे. यावर उपाय म्हणून आजपासून आम्ही कडक लॉकडाउन केले आहे. याचा चांगला परिणाम आगामी काळात दिसेल. लॉकडाउनमध्ये सातारकरांसह पोलिस, महसूल अधिकारी चांगल्याप्रकारे काम करत आहेत. यापुढेही प्रशासन सांगेल त्या पद्धतीने जनतेने अंमलबजावणी करायला हवी, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
 
पालकमंत्र्यांनी गुरुवारी अचानक सातारा शहरातील लॉकडाउन व बंदच्या स्थितीची पाहणी केली, तसेच गृह उपअधीक्षक धीरज पाटील व तहसीलदार आशा होळकर यांच्याशी बंदोबस्त आणि कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी साताऱ्यातून फेरफटका मारला. पोवई नाक्‍यावरून राजपथमार्गे राजवाडा तेथून कर्मवीर भाऊराव पथमार्गे पोलिस मुख्यालयातून सेव्हन स्टार मल्टिप्लेक्‍स चौकात त्यांनी पोलिस अधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा केली. लॉकडाउनला चांगले सहकार्य केल्याबद्दल सर्व सातारकरांचे कौतुक करतानाच त्यांनी बंदोबस्त चोख ठेवल्याबद्दल पोलिस प्रशासनाचेही त्यांनी कौतुक केले. सातारा शहरात बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर व गोरगरीब लोकांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटस्‌ची आवश्‍यकता असल्याचे तहसीलदार होळकर यांनी सांगितले.
 
पालकमंत्री पाटील म्हणाले, ""जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन चांगल्याप्रकारे यशस्वी केला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण कऱ्हाडात आहेत. याला कारण मुंबईतील लोकांचा संपर्क जेथे अधिक आहेत. तेथे संसर्ग अधिक दिसत आहे. त्यामुळेच कऱ्हाड, मलकापूर आजपासून पूर्णपणे लॉकडाउन केले आहे. या कालावधीत जीवनावश्‍यक वस्तू व मेडिकल व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून घरपोच दिले जाणार आहे. या लॉकडाउनचा चांगला परिणाम आगामी दिवसांत दिसून येईल.''

हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु

 महाबळेश्वर : ...अखेर वाधवानांची इच्छा पुर्णत्वास

Video : शिका अवघ्या काही सेकंदात कलिंगड कापण्याची कला 
 

रमजानमध्ये घरातच नमाज आदा करा 

येत्या 25 तारखेपासून मुस्लिम समाजाचा रमजानचा महिना सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम बांधवांनी रमजानच्या दिवसांत घरातच नमाज आदा करावी. अनावश्‍यक पाहुण्यांना बोलवू नये, तसेच इफ्तार पार्टीचेही आयोजन करू नये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे उपाय पाळावेत, असे आवाहन पालकमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.

क्लिक करा आणि हेही वाचा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाेलिसांवर हल्ले हाेत आहेत. या प्रकाराचा सातारकर साेशल मिडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करीत आहेत. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Minister Balasaheb Patil Asks Citizens Stay At Home Safely