
तारा जिल्ह्यातील सासपडे गावात एका १३ वर्षी मुलीचा अत्याचार करुन निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी या खुनाचा अवघ्या सहा तासांत उलगडा करून संशयित आरोपी राहुल बबन यादव यास अटक केली.यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले अन् आरोपीच्या घरावर हल्ला चढवला.घराची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी जादा कुमक मागवून ग्रामस्थांना रोखले.