पॅंट उतरविणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

नगरसेवक विनाेद खंदारे पालिकेत आल्यानंतर वारंवार कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून दमदाटी करत दहशतीचे वातावरण निर्माण करत असतात असे फिर्यादीत म्हटले आहे. 

सातारा : पालिकेतील उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात शौचालयाची पाण्याने भरलेली बादली नेऊन त्यांच्या पॅन्ट उतरवून त्यांच्या टेबलावर चढून शौचास बसतो असे म्हणत महिला व पुरूष कर्मचाऱ्यांसमोर असभ्य वर्तन करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोक्काच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ...अन्यथा मी पुन्हा येईन : शिवेंद्रसिंहराजे
 
याबाबत उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ (रा. केसरकर पेठ) यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता. 13) सकाळी दहाच्या सुमारास ते कार्यालयात काम करत होते. या वेळी बाळू खंदारे त्यांच्या केबीनचा दरवाजा उघडून आत आले. या वेळी त्याच्या हातात स्वच्छता गृहातील पाण्याने भरलेली बादली होती. मी तुमच्या केबीनमध्ये संडास करतो असे म्हणत त्यांनी पॅंट काढण्यास सुरवात केली. त्या वेळी ते मोठ्याने आर्वाच्च भाषेत बोलून शिवीगाळ करत होते. मी सांगितलेल विषय विषय पत्रिकेत का घेतले नाही असे ते म्हणाले. त्यावर विषय घेतले असल्याचे सांगितले. वाटल्या विषय पत्रीका दाखवितो असे म्हटले तरीही ते ऐकायला तयार नव्हते.

त्यानंतर टेबलावर चढून त्यांनी पॅंट आर्धी खाली घेतली. तसेच मी येथेच संडास करतो असे म्हणू लागले. खाली उतरविण्याची विनंती केल्यावर त्यांनी धुमाळ यांचा हात जोरात झटकला व धक्का देऊन खाली उतरले. खाली उतरल्यावर त्यांनी पॅट पुर्णपणे काढून धुमाळ यांच्या समोरील खुर्चीवर ठेवली.

अवश्य वाचा - Video पालिकेत गुंडशाही चालणार नाही - कल्पनाराजे भोसले
 
हा प्रकार सुरू असतानाच सभा अधिक्षक अतुल दिसले यांनी त्यांना विषय पत्रीका आणून दाखविली. त्यामध्ये विषय असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी पॅंट घातली. अशा प्रकारे त्यांनी पालीकेच्या पुरूष व महिला कर्मचाऱ्यांसमोर असभ्य वर्तन करत शासकीय कामात अडथळा आणला. खंदारे यांनी यापूर्वीही पालिकेतील महिला कर्मचरी रंजना भोसले व हिमाली कुलकर्णी यांच्याशी उद्धट वर्तन केले होते. परंतु त्यांच्या भितीने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही.

ते पालीकेत आल्यानंतर वारंवार कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून दमदाटी करत दहशतीचे वातावरण निर्माण करत असतात असेही धुमाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार खंदारेंवर आज शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Muncipal Council Officer Registered Complaint Against Corporator Balasaheb Khandare