आरक्षणाचा ठरावानंतर पालिका सभा तहकूब 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

सातारा -मराठा आरक्षणाची मागणी करत आत्महत्या करणाऱ्या युवकांना श्रद्धांजली वाहत आज सातारा पालिकेची मासिक सभा तहकूब करण्यात आली. पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ही सभा बोलवण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी विरोधी पक्षाचे प्रतोद अमोल मोहिते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला.

मराठा आरक्षण मागणीचा ठराव करून शासनाला पाठवावा, असेही त्यांनी सुचवले. सत्तारूढ आघाडीचे ऍड. दत्ता बनकर, विरोधी पक्षनेते अशोक मोने, भाजप सदस्य धनंजय जांभळे यांनी त्याला पाठिंबा देत सभा स्थगित करण्याची मागणी केली. सर्व पक्षीय सदस्यांची मागणी लक्षात घेऊन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. 

Web Title: satara Municipal Assembly adjourned after the resolution of reservation