काळचौंडीतील तिघांचा पुण्याजवळ अपघाती मृत्यू 

काळचौंडीतील तिघांचा पुण्याजवळ अपघाती मृत्यू 

म्हसवड - मोटारीने ट्रकला मागून धडक दिल्याने काळचौंडी (ता. माण) एकाच कुटुंबातील तिघांचा आणि मोटारचालकाचा मृत्यू झाला. 

डॉ. यशवंत पांडुरंग माने (वय 40), त्यांची पत्नी शारदा (38), मुलगा हृषीकेश (19) आणि चालक सुर्वे (पूर्ण नाव समजू शकले नाही) अशी मृतांची नावे आहेत. माने कुटुंबीय ग्रामदैवताच्या यात्रेला उपस्थित राहून मुंबईला परत जात होते. आज पहाटे सातारा-पुणे महामार्गावर पुण्याजवळ जांभूळवाडी येथे त्यांच्या मोटारीची ट्रकला धडक बसली. 

डॉ. माने हे मूळचे काळचौंडी येथील रहिवाशी असून, ते व्यवसायानिमित्त मुंबईत (चुनाभट्टी) येथे कुटुंबासमवेत स्थायिक झाले होते. ते रविवारी कुटुंबीयासह गावी आले होते. दिवसभर यात्रेचा कार्यक्रम उरकून रात्री अकरा वाजता त्यांनी मोटारीतून मुलीला मायणी येथील कॉलेजमध्ये सोडले. तेथून मुंबईकडे निघाले होते. यशवंत माने यांनी अतिशय कष्टाने गरिबीवर मात करून व्यवसाय उभा केला होता. 

त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने काळचौंडी गावासह माण तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे. 

...म्हणून मुलगी सुखरूप 
माने यांची मुलगी शुभांगी ही मायणी (ता. खटाव) येथे मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तिने मुंबईला परत येण्याचा हट्ट धरला होता. मात्र, तिचे शेवटचे वर्ष असल्याने तिची समजूत काढून तिला मायणीतच कॉलेजसाठी थांबण्यास सांगून ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. या अपघाताची बातमी माण तालुक्‍यासह काळचौंडी व मुंबई चुनाभट्टी येथे समजताच तेथे शोककळा पसरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com