टोल नाका फोडू नका... मी पाहतो... : उदयनराजे भोसले

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सातारा ः दसरा-दिवाळ सणाच्या पार्श्‍वभुमीवर युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था सांभाळणे अवघड जाईल. तरी रिलायन्स इन्फ्राने आनेवाडी टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नये, याबाबतचे निवेदन खासदार उदयनराजे भोसले यांनी आनेवाडी टोल नाक्‍यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर टोल नाका फोडू नका मला सांगा मी काय करायचे ते पाहतो, असा सल्ला खासदार भोसले यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिला.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 सातारा-पुणे रस्त्यावरली आनेवाडी टोल नाका याचे व्यवस्थापन सध्या असलेल्या कंपनीकडून अन्य कंपनीकडे जाणार असल्याची माहिती टोल नाक्‍यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाली. यामुळे आपल्याला कामावरुन कमी केले जाईल, अशी भिती कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन बदलाची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांना दिली. त्यानूसार खासदार भोसले यांनी आज (बुधवार) रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांची आनेवाडी टोल नाका येथे भेट घेतली. त्यावेळी शेकडो कर्मचारी उपस्थित होते. खासदार भोसले यांनी दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणे योग्य ठरणार नाही. स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण करु नका, असे रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

भुईंज पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक श्री. भरणे यांच्याशी चर्चा करताना खासदार भोसले म्हणाले, रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही अवघड जाईल. तरी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा बाळगतो.

Web Title: satara news anewadi toll naka and udayanraje bhosale