अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज एक जीबी डाटा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

सातारा - भारत संचार निगम लिमिटेडने रुपये 429 च्या विशेष टेरिफ व्हॉउचर्सद्वारे ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग तसेच दररोज एक जीबी इंटरनेट डाटा अशी योजना बाजारात आणली आहे. याबरोबरच रुपये 298 पासून ते रुपये 666 पर्यंतच्या व्हॉउचर्सवर दुप्पट इंटरनेट डाटा देण्यात येत आहे. 

"बीएसएनएल'ने सध्याच्या व नव्या ग्राहकांसाठी विविध प्लॅन्स व विशेष टेरिफ व्हाउचर्स बाजारात आणले आहेत. यामध्ये ग्राहकांना रुपये 298 मध्ये (नवीन ग्राहकांसाठी) प्रतिदिन थ्री जीबी डाटा, कोणत्याही नेटवर्कमध्ये 56 दिवसांसाठी अमर्याद कॉलिंग रुपये 349 मध्ये प्रतिदिन 2.5 जीबी डाटा कोणत्याही नेटवर्कमध्ये 26 दिवसांसाठी अमर्याद कॉलिंग, रुपये 395 मध्ये प्रतिदिन दोन जीबी डाटा, 71 दिवसांसाठी बीएसएनएल ते बीएसएनएल 3000 मिनिटे, कोणत्याही नेटवर्कसाठी 1800 मिनिटे कॉलिंग, 

रुपये 429 मध्ये प्रतिदिन एक जीबी, कोणत्याही नेटवर्कमध्ये 90 दिवसांसाठी अमर्याद कॉलिंग, रुपये 444 मध्ये 90 दिवसांसाठी प्रतिदिन दोन जीबी डाटा तसेच रुपये 666 मध्ये प्रतिदिन दोन जीबी डाटा, 60 दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कमध्ये अमर्याद कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी नजीकच्या ग्राहक सेवा केंद्रांत भेट द्यावी, असे आवाहन "बीएसएनएल'चे महाप्रबंधक राजेश कुमार यांनी केले आहे.

Web Title: satara news bsnl