केवळ १४१ रुपयांमध्ये बोला एक हजार मिनिटे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सातारा - भारत संचार निगम लिमिटेडने १४१ रुपयांचा नवीन मोबाईल प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना ३० दिवसांसाठी एक हजार मिनिटे सर्व नेटवर्कमध्ये बोलता येणार आहे. इंटरनेट युजर्ससाठी दररोज एक जीबी डाटा मिळणार आहे. या बरोबरच १०० एसएमएस (लोकल व नॅशनल) यांचा समावेश आहे. ही योजना ९० दिवसांसाठी लागू आहे. या कालावधीत नवीन सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळू शकणार आहे. याबरोबरच नव्या आणि जुन्या प्रिपेड ग्राहकांसाठी बीएसएनएलने प्लॅन १४१ अंतर्गत सहा महिन्यांसाठी ७७६ रुपयांचे रिजार्च व्हाउचर बाजारात आणले आहे.

सातारा - भारत संचार निगम लिमिटेडने १४१ रुपयांचा नवीन मोबाईल प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना ३० दिवसांसाठी एक हजार मिनिटे सर्व नेटवर्कमध्ये बोलता येणार आहे. इंटरनेट युजर्ससाठी दररोज एक जीबी डाटा मिळणार आहे. या बरोबरच १०० एसएमएस (लोकल व नॅशनल) यांचा समावेश आहे. ही योजना ९० दिवसांसाठी लागू आहे. या कालावधीत नवीन सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळू शकणार आहे. याबरोबरच नव्या आणि जुन्या प्रिपेड ग्राहकांसाठी बीएसएनएलने प्लॅन १४१ अंतर्गत सहा महिन्यांसाठी ७७६ रुपयांचे रिजार्च व्हाउचर बाजारात आणले आहे. यामध्ये ग्राहकास ६००० मिनिटे सर्व नेटवर्कसाठी, ६०० एसएमएसचा समावेश आहे.

इंटरनेट युजर्ससाठी दररोज १.२ जीबी डाटा मिळणार आहे. ग्राहकाने एक वर्षाचे रुपये १५५१ चे रिजार्च व्हाउचर खरेदी केल्यास त्यास १४ हजार ४०० मिनिटे सर्व नेटवर्कसाठी, १२०० एसएमस याबरोबरच इंटरनेट युजर्ससाठी दररोज १.५ जीबी डाटा मिळणार आहे. ग्राहकांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीएसएनएलद्वारे करण्यात आले आहे.

Web Title: satara news bsnl mobile plan