बैलांसह बेमुदत ठिय्यावर आंदोलक ठाम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सातारा - जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभाग यांच्याशी झालेल्या चर्चेतून सकारात्मक निर्णय न झाल्याने राज्यातील बैलगाडी चालक- मालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलांसह बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत.

बैल आमच्या हक्काचा... नाही कुणाच्या बापाचा, बैलगाडी शर्यत सुरू झालीच पाहिजे... अशी घोषणाबाजी करीत आंदोलकांनी "पेटा हटवा'ची मागणी केली. बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी बळिराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समिती महाराष्ट्रने आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल आणि पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर समितीचे अध्यक्ष हणमंतराव चवरे यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनस्थळी जाहीर केले.

Web Title: satara news bulls