साताऱ्यात आजपासून करिअर व्याख्यानमाला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

‘सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज’ प्रदर्शनात सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य

सातारा - सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज या करिअर प्रदर्शनाच्या निमित्ताने करिअरबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी करिअर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून, त्याचा प्रारंभ उद्या (शनिवारी) रजतसागर कॉम्प्लेक्‍स, पोवईनाका येथे होणार आहे. 

‘सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज’ प्रदर्शनात सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य

सातारा - सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज या करिअर प्रदर्शनाच्या निमित्ताने करिअरबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी करिअर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून, त्याचा प्रारंभ उद्या (शनिवारी) रजतसागर कॉम्प्लेक्‍स, पोवईनाका येथे होणार आहे. 

ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता प्रा. दत्तात्रय शिंदे (नॅशनल कॉलेज ऑफ फायर ॲण्ड सेफ्टी इंजिनिअरिंग) यांचे ‘फायर ॲण्ड सेफ्टी इंजिनिअरिंगमधील करिअरची संधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता विद्यार्थी व पालकांसाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण आणि डॉ. प्राची मास्तोळी (स्व- तंत्रा ब्रेन आणि माईंड जिम संचालक) यांचे ‘निर्णय कसा घ्याल’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहेत.  

रविवारी (ता. चार) सकाळी ११ वाजता आनंद कासट (ए. के. कॉमर्स ॲकॅडमी) हे ‘कॉमर्समधील ५० पेक्षा जास्त करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सायंकाळी पाच वाजता एम. ए. शेख (क्रिएटिव्ह ॲकॅडमी, पुणे) हे सातवी ते दहावीचे विद्यार्थी व पालकांसाठी ‘दहावीनंतरच्या करिअर संधी’बाबत मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानमालेद्वारे नर्सरीपासून पदवी, पदव्युत्तरपर्यंत आणि दहावी- बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रम व विविध कोर्सेसची माहिती मिळणार आहे. दहावीचा अभ्यास कसा करावा, दहावीनंतरच्या करिअरच्या संधी, शाखांची निवड, बारावीनंतरच्या इंजिनिअरिंग, मेडिकल, अभियांत्रिकी क्षेत्रातील जेईई, सीईटीसारख्या विविध प्रवेश परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम व बदललेले स्वरूप, त्याची तयारी आठवी, नववीपासून कशी करावी. देशातील ‘आयआयटी’सारख्या संस्था व त्यांच्या प्रवेश प्रक्रिया, प्युअर सायन्स (विज्ञान) शाखेतील करिअरचे पर्याय, बदलते शैक्षणिक धोरण, नवीन परीक्षा पद्धती याबाबत मार्गदर्शन होणार आहे.
शिक्षणातील पर्याय व पर्यायातील संधींचे आकलन व्हावे, यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी व्याख्यानमालेत अवश्‍य सहभागी व्हावे. 

सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज या करिअर प्रदर्शनात पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथील नामवंत शिक्षण संस्था आपल्या विविध अभ्यासक्रमांची थेट माहिती देतीलच, शिवाय त्या अनुषंगाने भविष्यात उपलब्ध असणाऱ्या संधींबाबतचे मार्गदर्शनही ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञांकडून मिळणार आहे. अधिक माहितीसाठी प्रदीप राऊत (९९२३२३३९९९) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: satara news career lecture