सव्वा लाखाची रक्कम साताऱ्यात लुटली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

सातारा - खाज सुटण्याची पावडर वृद्धाच्या अंगावर टाकून चोरट्यांनी आज पोवई नाका परिसरात एक लाख 30 हजार रुपये लंपास केले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात सुरू होती. 

संबंधित गृहस्थ आज दुपारी पोवई नाका येथील एका बॅंकेत आले होते. तेथे त्यांनी 80 हजार रुपये काढले. हे पैसे व जवळचे 50 हजार रुपये त्यांनी पिशवीत ठेवले. त्यानंतर ते चहा पिण्यासाठी पोवई नाका परिसरातील एका टपरीवर गेले. या वेळी अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या मानेवर खाज सुटण्याची पावडर टाकली. खाज सुटल्यामुळे त्यांनी पिशवी बाजूला ठेवली. ही संधी साधत चोरट्यांनी पिशवी लंपास केली. याबाबत त्यांनी माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. 

Web Title: satara news cash loot

टॅग्स