‘एसपीं’च्या उपस्थितीत शाळेचा श्रीगणेशा

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सातारा - सीबीएसई बोर्डाची मान्यता असलेल्या; परंतु जिल्हा परिषदेची मान्यता नसताना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या साक्षीने आजपासून चिमुकल्यांनी पूर्व प्राथमिकचे धडे गिरविण्याचा ‘श्री गणेशा’ केला. दरम्यान, शाळा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच शहरातील बहुतांश शाळांनी प्रक्रिया सुरू केल्याने शिक्षण विभागाच्या पारदर्शक कामकाजाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वीच शहरातील बहुतांश शाळांनी पूर्व प्राथमिकपासून इयत्ता आठवीपर्यंतच्या प्रवेशासाठी अर्ज विक्री, प्रत्यक्ष प्रवेश देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत दै. ‘सकाळ’ने यापूर्वीच शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. आता तर केंद्र आणि राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या; परंतु अद्याप जिल्हा परिषदेची मान्यता न मिळालेल्या सीबीएसई बोर्डाच्या एका शाळेने आजपासून चिमुकल्यांना ज्ञार्नाजनाचे धडे देण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्तेच विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार एकही मुलगा अथवा मुलगी शाळा प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वीच आगामी शैक्षणिक वर्षे सुरू केल्याचा हा धक्कादायक प्रकार आज समोर आला. 

प्रवेश वेळापत्रकाबाबत कल्पनाच नाही
शाळेला राज्य शालेय शिक्षण विभागाची मान्यता आहे. जिल्हा परिषदेकडूनच शाळेचा प्रस्ताव गेला होता. शाळा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाते का याची कल्पना आम्हाला नाही. शाळेचे व्यवस्थापन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टकडे असून, अन्य ठिकाणी त्यांची प्रक्रिया चालते तशीच साताऱ्यातही सुरू आहे, असे पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Web Title: satara news cbse board Superintendent of Police Sandeep Patil