वडूजला दहा महिन्यांत  तीन ‘सीओ’..!

आयाज मुल्ला 
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

वडूज - नगरपंचायत स्थापन होऊन जेमतेम दहा महिन्यांचाच कालावधी झाला आहे. या दहा महिन्यांतच नगरपंचायतीवर तीन मुख्याधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. नगरपंचायतीत कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांअभावी अनेक कामे रखडली आहेत. शहर आणि प्रभाग विकासाच्या आणाभाका मारून सत्तेत आलेल्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या मागे ही कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांचा ससेमिरा लागला आहे. तर मुख्याधिकाऱ्यांअभावी अनेक कामे रखडल्यामुळे पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकही वैतागले आहेत.

नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी म्हणून माधव खांडेकर यांची वर्णी लागली. एक ते दोन महिने हा कारभार व्यवस्थित चालला. नंतर श्री. खांडेकर व नगरपंचायतीचे उपाध्यक्ष संदीप गोडसे, काही नगरसेवकांत कामकाजावरून खटके उडू लागले. नंतर श्री. खांडेकर गेली तीन ते चार महिने रजेवर आहेत. या कालावधीत त्यांच्या जागेचा कार्यभार म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र, श्री. पाटील यांच्याकडे हे अतिरिक्त काम असल्याने त्यांना येथे अधिक वेळ देता येत नव्हता. 

श्री. पाटील यांनी साधारणत: दोन महिने हे काम पाहिले. या कालावधीत ते आठवड्याभराने नगरपंचायतीत येत होते. त्यानंतर कऱ्हाडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे येथील मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. श्री. डांगे यांच्याकडे अगोदर कऱ्हाडसारख्या मोठ्या व विस्तारलेल्या शहराचा पदभार असल्याने त्यांनाही येथे पुरेसा वेळ देता येत नसल्याचे समजते. 

पदभार स्वीकारताना श्री. डांगे आले होते, त्यानंतर त्यांची अनुपस्थिती जाणवत असल्याचे समजते. 

पूर्ण वेळ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून अनेक कामे रखडली आहेत. विशेषत: रमाई घरकुल योजनेतील सुमारे ५० लाभार्थी अर्जांच्या मंजुरीचे प्रस्ताव रखडले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या पाइपलाइनच्या कामाबाबत नगरपंचायतीच्या बैठकीत चर्चा झाली होती, त्यानंतर मात्र मुख्याधिकारीच नसल्याने त्यावरही कार्यवाही राहिली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, हे कामदेखील रखडले आहे. याशिवाय घरांच्या नोंदी, बांधकाम परवाने आदी कामे मुख्याधिकाऱ्यांअभावी ठप्पच आहेत. 

Web Title: satara news CEO