कोल्हापूरमधून चोरलेल्या दुचाकीसह युवक अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

सातारा - कोल्हापूर बसस्थानकाजवळून दुचाकी चोरणाऱ्यास येथील शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित दुचाकीच्या मालकाबाबत माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन हवालदार एच. आर. तडवी यांनी केले आहे. 

सातारा - कोल्हापूर बसस्थानकाजवळून दुचाकी चोरणाऱ्यास येथील शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित दुचाकीच्या मालकाबाबत माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन हवालदार एच. आर. तडवी यांनी केले आहे. 

ओंकार नामदेव कोरे (वय 19, रा. चोरे, ता. कऱ्हाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बुधवारी (ता. 23) गस्त घालत असताना एक युवक नंबरप्लेट नसलेली दुचाकी चालवत असल्याचे शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या निदर्शनास आले. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला गोल मारुती परिसरात पकडले. चौकशीमध्ये त्याने ती दुचाकी कोल्हापूर बस स्थानकाजवळून चोरली असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र, दुचाकी मालकाचा शोध पोलिसांना लागलेला नाही. काळ्या रंगाची ही हिरवे पट्टे असलेली ही गाडी आहे, तसेच त्याच्या नंबरप्लेटच्या मागे केए 22 ईजे 3165 हा क्रमांक आहे, तसेच चेसी क्रमांक एमबीएलएचए 10 एएससी 9 सी00718, तर इंजिन क्रमांक एचए 10 ईएलसी 9 सी 00737 असा आहे. या गाडीबाबत काही माहिती असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: satara news crime