सातारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक बंदमध्ये होणार सहभागी

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

सातारा ः विविध मागण्यांवर शासन अजून ही निर्णय घेत नसल्याने त्याविरोधात देशभरातील 54 हजार पेट्रोल पंप शुक्रवारी (ता.13) बंद ठेवण्याचा निर्णय युनायटेड पेट्रोलिमय फ्रंटने घेतला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक सहभागी होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने दिली.

गेली अनेक वर्षांपासून डिलर्सचे प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत. यात चार नोव्हेंबरला तेल कंपन्यांबरोबर संघटनांकडून करार करण्यात आला होता. या करारातील अटी आतापर्यंत पाळण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पेट्रोलियम क्षेत्रात काम करणाऱ्या तीन महत्त्वाच्या संघटना एकत्रित आलेल्या असून, 13 ऑक्‍टोबरला पेट्रोल-डिझेल विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन सातारा जिल्हा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना दिले.

Web Title: satara news district petrol pump strike