युवतींचा कल संस्कारभारतीच्या रांगोळीकडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

सातारा - दिवाळीच्या आनंदी वातावरणाला आणखी प्रसन्न करणारी अंगणातील रांगोळी नागरिकांच्या घरोघरी पोचावी, यासाठी बाजारात विविध रंग छटातील रांगोळी दाखल झाली असून, रस्त्याकडेला बसून अनेक महिला त्याची विक्री करत आहेत. युवतींचा कल संस्कारभारतीच्या रांगोळीसाठी पावडर कलरकडे वाढला आहे. दरम्यान, संस्कार भारतीच्या विविध प्रकारच्या रांगोळ्यांच्या कलाकृती असलेल्या पुस्तकांचाही खप वाढला आहे. 

रांगोळीची कला प्रत्येक महिला जपते. आता दिवसेंदिवस रांगोळ्या काढण्याच्या पद्धती बदलत आहेत. पूर्वी फक्त ठिपक्‍यांच्या रांगोळ्या होत्या. आता सुबक रांगोळ्यांसाठी कोन, ठसे, स्टिकर, तसेच रांगोळ्यांवरील पुस्तके व साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. युवतींचा कल हा प्राधान्याने संस्कारभारती पद्धतीच्या रांगोळ्या काढण्याकडे आहे. आकर्षक आकृत्या, फुलांची व वळणदार नक्षीची त्यातील गुंफण यामध्ये रंगीत रांगोळीने रंगसंगती साधल्यास रांगोळ्या अत्यंत आकर्षक दिसतात. त्यामुळेच अनेक दुकानांत या पावडर रंगांची मागणी वाढली आहे. 

प्रत्येक कुटुंबात दिवाळीस रांगोळीची खरेदी ही होतेच. अनेक मुली अंगणात मोठी रांगोळी काढतात. यामुळेच रांगळीचा खपही वाढला आहे. वाढलेला खप लक्षात घेऊन अनेक महिला किरकोळ रांगोळी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यातून रोजी रोटीचा त्यांचा या दिवसात तरी प्रश्‍न मिटत आहे. या महिला काचेच्या पेल्याच्या मापाने रांगोळ्या विकत आहेत. 

सध्या पांढरी रांगोळी साधारण दहा रुपये किलो, तर रंगीत रांगोळी 20 ते 30 रुपये किलो या दराने विकली जात आहे. रांगोळीबरोबरच सुरेख आणि सुलभ रांगोळी रेखाटण्यासाठी पिठाच्या चाळणीसारखी जाळी, प्लॅस्टिकचे ठसे, रांगोळीचे पट्टे, रांगोळीचे रंगीत पेन आणि रांगोळी चमकावी, यासाठी चकमकही विक्रीसाठी आली आहे. त्याचा सेट पंधरापासून 150 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. 

ठशांनाही मागणी  
संस्कार भारतीची विविध पुस्तके बाजारात हातोहात विकली जात आहेत. या रांगोळीसाठी लागणारी पावडरही काही दुकानांत 60 रुपये किलोने विकली जात आहे. शुभ लाभ, स्वस्तिक, लक्ष्मीची पावले, गाय- वासरू, कलश व देव- देवतांची नावे यांच्या पारंपरिक शुभ लक्षणी ठशांनाही मागणी आहे.

Web Title: satara news diwali festival rangoli

टॅग्स