नो डाॅल्बीच्या नाऱ्यावर मंडळांचा सावध पवित्रा 

सचिन शिंदे
रविवार, 3 सप्टेंबर 2017

तीन पथक... तीन यंत्र 
​पोलिसांनी ध्वनी प्रदुषणाबाबत कडक कारवाईची तयारी केली आहे. त्यासाठी तीन पथकांची स्थापना केली आहे. दरवर्षी एक यंत्र असते. यावर्षी आवाज तपासणारी तीन यंत्र आणली आहेत. त्यामुळे पोलिस डाॅल्बी लावणारावर थेट कारवाईच्याच पवित्र्यात आहेत.

कऱ्हाड : पोलिसांना नो डाॅल्बीचा दिलेला नारा आणि त्याला सार्वजनिक गणेश मंडळांनी काहीच भुमिका जाहीर न करता वेट आॅण्ड वाॅचची  घेतलेली भुमिका अशीच सध्या शहरात स्थीती आहे. डाॅल्बी लावला तर कारवाई होणार का याची खात्री करण्याचे काम काही मंडळ करत आहेत. त्यामुळे दोन दिवसात येणाऱ्या अनंत चतुदर्शीला डाॅल्बीचा दणदणाट कानावर पडणार की पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

पोलिसांनी नो डाॅल्बीचा नारा दिला आहे. अनेक पातळ्यांवर पोलिसांनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत. वरिष्ठांच्या दोन बैठका, तापदायक मंडळांच्या स्वतंत्र बैठका, प्रत्येक मंडळांचे प्रबोधन अशा पातळ्यांवर झालेले प्रयत्न पोलिसांना आशादायक वाटत आहेत. त्यामुळे डाल्बीला मंडळ फाटा देतील, अशी पोलिसांना अपेक्षा आहे. ते करतानाच डाॅल्बी लावणारा विरोधात कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. काही दिवसापूर्वी आलेले दोन डाॅल्बी पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे पोलिस सर्वबाजूने डाॅल्बी नको अशा भुमिकेत आहेत. मात्र मंडळ अद्यापही संभ्रमावस्थेत दिसत आहेत. डीजे लावला तर काय होईल, याचा काही मंडळे कानोसा घेत आहेत. सगळ्या डीजे नाही तर दोन टाॅप दोन बेस लावले तर पोलिस काय करणार का अशी विचारणा करण्यासाठी पोलिस ठाण्यात कार्यकर्ते हेलपाटे मारत आहेतॊ पोलिसांनी पूर्ण डाॅल्बीला बंदी घातली असली तरी डाॅल्बी लावणार नाही, अशी कुठल्याच मंडळाने अजून भुमिका घेतलेली नाही.

डाॅल्बी लाववा की नको याच द्विधदा मनस्थीतीत मंडळ आहेत. काही मंडळांनी नेत्यांच्या गाठी घेवून तेवढ पोलिसांच बघा, आम्ही डाॅल्बी लावतो. अशा विनंत्या सुरू केल्या आहेत. काही मंडळ दोन टाॅप दोन बेस लावणारच या हट्टावर आहेत. काही मंडळ बैठक घेवून ठरवणार अशा भुमिकेत आहेत. त्यामुळे डाॅल्बीच्या प्रतिसाद मंडळ किती साथ देतील, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. मागील वर्षीही पोलिसांनी असाच प्रयत्न केला. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. मात्र मागील वर्षी सायंकाळनंतर निघालेल्या प्रत्येक मंडळाने डाॅल्बीचा दणदणाट केला होता. जवळपास सोळा मंडळांच्या डाॅल्बीने कऱ्हाड दणाणले होते. त्यावेळी पोलिसांना काहीही करता आले नव्हते. निव्वळ केस दाखव करणे या पलिकडे पोलिसांनी काहीही केले नव्हते. या वर्षी वेगळी स्थिती निश्चीत आहे. पोलिसांना उत्सव सुरू होण्यापासून नो डाॅल्बीचा जोर धरला आहे. त्याला कमी अधिक प्रमाणात मंडळांनी साथ दिली आहे. मात्र मंडळांच्या नेमक्या काय भुमिका आहेत. ते अद्याप स्पष्ट नसल्याने पोलिस सावध भुमिकेत आहेत. अनंत चतुदर्शीला गणेश मुरेती विसर्जीत करणारी जवळपास दोनशे मंडळ आहेत. त्यामुळे पोलिस सतर्क आहेत. अनेकांनी पोलिसांना डाॅल्बी लावणार नसल्याची ग्वाही दिली असली तरी बहुतांश मंडळांच्यै भुमिका अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे पोलिसांसह अनेकांचे नो डाॅल्बीला कसा प्रतिसाद मिळणार याकडे लक्ष आहे.

तीन पथक... तीन यंत्र 
पोलिसांनी ध्वनी प्रदुषणाबाबत कडक कारवाईची तयारी केली आहे. त्यासाठी तीन पथकांची स्थापना केली आहे. दरवर्षी एक यंत्र असते. यावर्षी आवाज तपासणारी तीन यंत्र आणली आहेत. त्यामुळे पोलिस डाॅल्बी लावणारावर थेट कारवाईच्याच पवित्र्यात आहेत.

Web Title: Satara news dolby system in karhad

टॅग्स