जिल्‍ह्यात महावितरणची वसुली मोहीम गतिमान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

१७ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी

सातारा - वीजबिलांची वाढती थकबाकी ही चिंतेची बाब असून ती वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. सातारा जिल्ह्यात १७ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे त्यांनी सांगितले. 
थकबाकीदारांनी वीजबिलांची थकबाकी त्वरित भरून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील १६ लाख ८२ हजार वीज ग्राहकांकडे सद्य:स्थितीत २३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात दोन लाख १२ हजार ग्राहकांकडे १७ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी आहे. 

वाढत्या थकबाकीसह विविध मुद्द्यांवर प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नुकताच संवाद साधला. यावेळी त्यांनी वाढत्या वीज बिलांच्या थकबाकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच थकीत वीजबिलांच्या वसुलीची मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश दिले.

पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबतच्या उपाययोजना तसेच वीजबिलांची थकबाकी वसूल करण्याच्या कामांत दिरंगाई झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

थकबाकीदारांनी वीजबिलांची रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासाठी सुरू झालेल्या धडक कारवाईचे पर्यवेक्षण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची वेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: satara news electricity recovery campaign