जिल्ह्यात आज फुटबॉल फिवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सातारा - 17 वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेनिमित्ताने होणाऱ्या महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन अंतर्गत उद्या (शुक्रवार) जिल्ह्यातील सर्व शाळांत फुटबॉल खेळला जाणार आहे. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या सामन्यांमध्ये लोकप्रतिनिधी, पोलिस, शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शाळा आणि महाविद्यालयांतील खेळाडू सहभागी होतील. जिल्ह्यात सुमारे 30 हजार खेळाडू एकाच दिवशी एकाच वेळी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटून भारतीय संघास शुभेच्छा देतील, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांनी दिली. 

श्री. पाटील म्हणाले, "17 वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धा सहा ते 24 ऑक्‍टोबरदरम्यान होत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रीम प्रोजेक्‍ट जाहीर केला आहे. फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी व राज्यातील मुलामुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन कार्यक्रम हाती घेतलेला आहे. महाराष्ट्रातील 30 हजार शाळांत प्रत्येकी तीन फुटबॉलप्रमाणे एक लाख फुटबॉल वाटण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 500 शाळांनी नोंदणी केल्यानुसार सुमारे 30 हजार खेळाडूंना फुटबॉलच्या वितरणास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलामुलींचे स्वतंत्र संघ तयार करून फुटबॉल खेळणे, स्पर्धा घेणे असे उपक्रमांचे नियोजन केले आहे. याबरोबरच जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशन, तसेच विविध क्रीडा संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुलात फुटबॉल स्पर्धा होत आहे. सकाळी नऊ वाजता त्याचे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजन केले आहे. सातारा पोलिस, फुटबॉल संघटना यांच्यासह आठ ते दहा क्रीडा संस्थांचे संघात सामने होतील. या सामन्यांतील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी नमूद केले. 

Web Title: satara news Football Fever